Iran US war Donald Trump Latest News: इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. सोशल ट्रूथ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ट्रम्प म्हणाले की, आम्ही (अमेरिका) इराणसोबतचेयुद्ध लवकरच थांबवण्याचा विचार करत आहोत. पण, ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबद्दलही एक महत्त्वाचं विधान केले आहे.
अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याच्या तयारीत असल्याचे रिपोर्ट्स समोर येत असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याबद्दल भूमिका मांडली आहे.
अमेरिका उद्दिष्ट साध्य करण्याच्या खूप जवळ -ट्रम्प
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आम्ही इराणच्या दहशतवादी सरकारविरोधात मध्य पूर्वेत सुरू असलेली आमची मोठी लष्करी मोहीम हळूहळू थांबवण्याचा विचार करत आहोत. कारण आम्ही आमची उद्दिष्टे साध्य करण्याच्या खूप जवळ आहोत."
युद्ध थांबवण्याच्या विचारात असल्याचे सांगतानाच ट्रम्प यांनी आणखी अट ठेवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, "याची (होर्मुझ सामुद्रधुनी) देखरेख आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्या देशांनी घ्यायला हवी, जे याचा वापर करतात."
होर्मुझ सामुद्रधुनी ही तेल-गॅस निर्यात होणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. रिपोर्ट्सनुसार जगाच्या एकूण तेल निर्यातीपैकी २० टक्के तेल होर्मुझ सामुद्रधुनीत जाते.
संरक्षण करण्यासाठी अमेरिका 'त्या' देशांना मदत करेन
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, "जर आम्हाला सांगितले, तर आम्ही या देशांना होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेशी संबंधित प्रयत्नांना मदत करू. पण, इराणचा धोका संपल्यानंतर याची गरज पडणार नाही. महत्त्वाची बाब ही आहे की, या देशांसाठी ही एक सोप्पी लष्करी मोहीम असेल."
युद्धातून अमेरिकेने काय मिळवले? ट्रम्प यांनी सांगितले
२८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या युद्धात अमेरिकेने काय साध्य केले, या प्रश्नाचे उत्तरही ट्रम्प यांनी दिले आहे.
ट्रम्प यांनी दावा केला की, "इराणची मिसाईल क्षमता पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे आणि इराणच्या लष्करी औद्योगिक तळालाही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर याचीही खात्री करण्यात आली की, इराण कधीही अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळही पोहोचणार नाही."
ट्रम्प म्हणाले की, "मध्य पूर्वेत अमेरिकेने आपले सहकारी देश इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरातील, बहरीन, कुवैत आणि इतर देशांना सर्वोच्च सुरक्षा दिली आहे."
Web Summary : Trump suggests ending the military campaign against Iran, nearing objectives. He demands countries using the Hormuz Strait oversee its protection. US will assist if needed, focusing on regional security. Iran's missile capabilities are decimated, preventing nuclear weapons development. Allies are safer.
Web Summary : ट्रम्प ने ईरान के खिलाफ सैन्य अभियान समाप्त करने का सुझाव दिया, लक्ष्य के करीब। उन्होंने मांग की कि होर्मुज जलडमरूमध्य का उपयोग करने वाले देश इसकी सुरक्षा की निगरानी करें। जरूरत पड़ने पर अमेरिका मदद करेगा, क्षेत्रीय सुरक्षा पर ध्यान केंद्रित करेगा। ईरान की मिसाइल क्षमता नष्ट हो गई है, जिससे परमाणु हथियार विकास को रोका जा सका है। सहयोगी सुरक्षित हैं।