हमास परतणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध; ट्रम्प यांचा गाझावर ताबा मिळविण्याचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:45 IST2025-02-11T09:45:30+5:302025-02-11T09:45:56+5:30

इस्रायली सेना समझोत्यानुसार रविवारी गाझा कॉरिडॉरमधून दूर झाली आहे.

We are committed to Hamas not returning; Donald Trump reiterates commitment to take control of Gaza | हमास परतणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध; ट्रम्प यांचा गाझावर ताबा मिळविण्याचा पुनरुच्चार

हमास परतणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध; ट्रम्प यांचा गाझावर ताबा मिळविण्याचा पुनरुच्चार

मुगराका (गाझा पट्टी) : हमासकडून बंधक बनविलेल्यांची स्थिती दयनीय असल्याची माहिती पुढे आल्यानंतर गाझाशी केलेला युद्धबंदी करार वाढविण्याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर दबाव वाढला आहे, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर ठाम असून, अमेरिका पॅलेस्टिनी भागावर ताबा मिळविणार असल्याचा पुनरुच्चार केला. 

युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरू होणार होती. परंतु, इस्रायल व हमास यांच्यातील चर्चेमध्ये कोणतीही विशेष प्रगती झाली नाही. इस्रायली सेना समझोत्यानुसार रविवारी गाझा कॉरिडॉरमधून दूर झाली आहे. तर ट्रम्प यांनी एअर फोर्स वन विमानात म्हटले आहे की, गाझाच्या पुनर्निर्माणासाठी पश्चिम आशियाच्या काही देशांचे सहकार्य घेतले जाईल. परंतु, तेथे हमास परतणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध राहू.

एक सेंटच्या नाण्याचे यापुढे उत्पादन नाही
ट्रम्प यांनी एक सेंटच्या नाण्यांच्या उत्पादन खर्चाचा हवाला देत म्हटले आहे की, वित्त मंत्रालयाला नवीन नाण्यांचे उत्पादन बंद करण्यास सांगितले आहे. एक सेंटच्या नाण्यांचे उत्पादन निरर्थक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे नवे सरकार प्रशासनावरील खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

कॅनडा ५१वे राज्य? 
कॅनडाला ५१ वे राज्य करण्याबाबत आपण गांभीर्याने विचार करीत आहोत, असेही ते म्हणाले. कॅनडामुळे आम्हाला दरवर्षी २०० कोटींचा फटका बसतो. आता असे मी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

आयातीवर लावण्यात येणार २५ टक्के शुल्क
कॅनडा व मॅक्सिकोसह पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या सर्व आयातींवर २५ टक्के शुल्क लावण्यात येणार आहे. एखाद्या देशाने अमेरिकेच्या वस्तूंवर १३० टक्के शुल्क लावले असेल तर आम्ही त्यांच्याकडून कसलेही शुल्क घेणार नाहीत, अशी स्थिती आता राहणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

इस्लामी क्रांतीचा वर्धापन दिन साजरा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प परतल्यानंतर व इराणवर दबाव टाकण्याची मोहीम सुरू केल्यानंतर हजारो इराणींनी देशाच्या १९७९च्या इस्लामी क्रांतीचा वर्धापनदिन साजरा केला. 

Web Title: We are committed to Hamas not returning; Donald Trump reiterates commitment to take control of Gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.