शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:51 IST

Israel Iran War News: मध्य पूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला असून इस्रायल आता इराणला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

मध्य पूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला असून इस्रायल आता इराणला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. इस्रायलनेइराणमधील जनजीवन आणि औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे विस्कळीत करण्यासाठी एक मोठा मास्टरप्लॅन आखला असून, पुढील ४८ तासांच्या आत हा हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायलचा हा हल्ला केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित नसून, इराणची अर्थव्यवस्था आणि नागरी सुव्यवस्था कोलमडवून टाकणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.

'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचा पुढील हवाई हल्ला इराणची वीज निर्मिती केंद्रे, ऊर्जा सुविधांवर करणार आहे. हा नियोजित हल्ला पुढील काही दिवसांतच सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर ही लष्करी कारवाई केली जाणार आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इस्रायलला इराणविरुद्ध अधिक आक्रमक पाऊल उचलण्याचे बळ मिळाले असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान नेतन्याहू यांचा मोठा खुलासा

शनिवारी संध्याकाळी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोहिमेची व्याप्ती वाढवल्याचे जाहीर केले. नेतन्याहू म्हणाले की, "आमच्या हवाई दलाच्या मोहिमेत आता इराणच्या अशा पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा वापर नागरी कामांसोबतच लष्करी हेतूंसाठीही केला जातो. शत्रूला शस्त्रास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या प्रत्येक घटकाला आम्ही उद्ध्वस्त करू."

स्टील आणि पेट्रोकेमिकल उद्योगांवर निशाणा

इस्रायलने दावा केला आहे की, इराणच्या पोलाद उद्योगाचा सुमारे ७० टक्के भाग यापूर्वीच निष्प्रभ करण्यात आला आहे. या उद्योगांमधून तयार होणाऱ्या स्टीलचा वापर प्रामुख्याने शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी केला जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. शस्त्रास्त्र निर्मितीचा मुख्य स्त्रोत असल्याने स्टील क्षेत्रावर लक्ष्य केले जाणार आहे. तसेच पेट्रोकेमिकल प्रकल्पातील विशिष्ट साहित्याचा वापर युद्धजन्य साहित्यासाठी होत असल्याचा इस्रायलला संशय आहे. हे दोन्ही उद्योग इस्रायल आणि जगाविरुद्ध दहशतवाद पसरवण्यासाठी इराणला आर्थिक रसद पुरवत असल्याचा आरोप नेतन्याहू यांनी केला आहे.

ऊर्जा क्षेत्र ठप्प करण्याची योजना

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचा पुढचा टप्पा इराणच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करेल. यामध्ये प्रामुख्याने मुख्य वीज निर्मिती केंद्रे, ऊर्जा साठवणूक सुविधा आणि राष्ट्रीय वीज वितरण जाळे यांचा समावेश आहे. जर हा हल्ला यशस्वी झाला, तर इराणमधील जनजीवन आणि औद्योगिक उत्पादन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते. 

जगासमोर मोठं संकट

या संभाव्य हल्ल्याच्या वृत्तामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवला असला तरी, हा संघर्ष पूर्ण युद्धाचे रूप घेईल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, इराणनेही हाय अलर्ट जारी केला असून, कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, इस्रायलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हवाई सामर्थ्यापुढे इराण आपले औद्योगिक क्षेत्र कसे वाचवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Prepares Major Strike on Iran: 48-Hour War Warning?

Web Summary : Israel plans a major strike on Iran within 48 hours, targeting power plants and energy infrastructure to cripple the economy. Netanyahu vows to destroy facilities aiding weapon production, focusing on steel and petrochemical industries. Global markets fear rising oil prices amid escalating tensions.
टॅग्स :Warयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका