छोटा राजनच्या घरवापसीत ज्वालामुखीचे विघ्न

By Admin | Updated: November 4, 2015 09:20 IST2015-11-04T09:19:54+5:302015-11-04T09:20:16+5:30

इंडोनेशियातील रिजानी येथे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विमानसेवा बंद झाल्याने छोटा राजनची घरवापसी लांबणीवर पडली आहे.

Volcanic eruption in Chhota Rajan's homecoming | छोटा राजनच्या घरवापसीत ज्वालामुखीचे विघ्न

छोटा राजनच्या घरवापसीत ज्वालामुखीचे विघ्न

ऑनलाइन लोकमत 

बाली, दि. ४ - इंडोनेशियातील रिजानी येथे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियातील बाली विमानतळावरील विमान सेवा गुरुवारपर्यंत बंद करण्यात आली आहे. विमानसेवा बंद झाल्याने छोटा राजनची घरवापसी लांबणीवर पडली आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली असून छोटा राजनला भारतात आणण्यासाठी भारताचे पथक बालीत दाखल झाले आहे. राजनला भारतात आणण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असून मंगळवारी छोटा राजनला घेऊन भारतीय अधिका-यांचे पथक भारतात परतणार होते. मात्र इंडोनेशियात सध्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने विमान सेवा विस्कळीत झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बाली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंडोनेशियातील विमानसेवा बंद झाल्याने हजारो प्रवासी इंडोनेशियात अडकून पडले आहेत. 

Web Title: Volcanic eruption in Chhota Rajan's homecoming