शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' सोशल मीडिया पोस्टनंतर ब्लादिमीर पुतिन यांची 'मुलगी' अचानक झाली गायब, वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 11:44 IST

Vladimir Putin secret daughter vanishes : पुतिन आपल्या कथित मुलीच्या वागण्यावर संतापले होते आणि तिच्या गायब होण्यामागे त्यांचा हात असू शकतो.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची कथित मुलगी लूइजा क्रिवोनोगिक (Luiza Krivonogikh) अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लुईजने तिच्या आईच्या ३.१ मिलियन डॉलरच्या पेंटहाऊसचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून तिचा काहीच पत्ता नाहीये. असं मानलं जात आहे की, पुतिन आपल्या कथित मुलीच्या वागण्यावर संतापले होते आणि तिच्या गायब होण्यामागे त्यांचा हात असू शकतो. लूइजा ब्लादिमीर पुतिन यांची गर्लफ्रेन्ड स्वेतलाना क्रिवोनोगिखची मुलगी आहे.

मुलीवर नाराज होते पुतिन 

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, १८ वर्षीय लूइजाच्या आईचं नाव या वर्षाच्या सुरूवातील पॅंडोरा पेपर्स लीकमध्ये समोर आलं होतं. यात तिच्या अनेक संपत्तींचा उल्लेख करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यात लूइजाने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही. असं मानलं जातं आहे की, पुतिन लुईजावर आधीच नाराज होते आणि पेंटहाऊसचा फोटो शेअर केल्यावर ते अधिकच रागावले. अशात अशी शक्यता वर्तवली जात आहे की, पुतिन यांनी त्यांच्या मुलीला गायब केलं.

पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली होती स्वेतलाना

पॅंडोरा पेपर्स लीक ज्यात १.९ मिलियनपेक्षा अधिक संवेदनशील कागदपत्रे होती. ज्यात सांगण्यात आलं होतं की, स्वेतलाना लुईजाच्या जन्मानंतर लगेच मोटे कार्लो पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली होती. ज्यानंतर असं म्हटलं जात होतं की, लुइजा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचीच मुलगी आहे. दुसरीकडे पुतिन यांनी ही बाब खोटी असल्याचं म्हटलं होतं. आणि मीडियाला त्यांच्या खाजगी आयुष्यात न डोकावण्याचा सल्ला दिला होता. लुइजा  luziaroz नावने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट चालवते. 

नातं जुळताच बदललं नशीब

पुतिन यांच्या कथित मुलीने शेवटची पोस्ट १ ऑक्टोबरला केली होती. यानंतर तिचा काहीच पत्ता नाहीये. 'गार्डियन'च्या रिपोर्टमध्ये काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते की पुतिनसोबत मैत्री केल्यानंतर स्वेतलाना क्रिवोनोगिखची संपत्ती कमालीची वाढली होती. तिने सेंट पीटर्सबर्गमध्ये महागड्या भागात फ्लॅट, मॉस्कोमध्ये संपत्ती आणि एक क्रूज खरेदी केलं होतं. याची व्हॅल्यू साधारण १०० मिलियन डॉलर होती. असं सांगितलं जातं की, स्वेतलाना पुतिन यांच्या घरी सफाईचं काम करत होती आणि पुतिनसोबतच्या नात्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाSocial Mediaसोशल मीडिया