शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

अमेरिका-रशियात तणाव; 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: पुतिन

By sagar.sirsat | Published: July 31, 2017 6:56 AM

रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे.

ठळक मुद्देरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. ''अमेरिकी दुतावास आणि अन्य कार्यालयांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून जास्त लोक काम करत होते आणि अजूनही करत आहेत. पण 755 जणांना रशियातील आपलं कामकाज थांबवावं लागेल'' ''अमेरिकेसोबतचे संबंध दिर्घकाळ सुधारणार नाहीत''अमेरिकेच्या सीनेटने गुरूवारी एका विधेयकाला मंजुरी दिली होती.

मॉस्को, दि. 31 - रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. रशियाच्या एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमेरिकेच्या राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितल्याचं वृत्त आहे. अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध घातल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.  रोसिया-24 या न्यूज चॅनलला व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत, ''अमेरिकी दुतावास आणि अन्य कार्यालयांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून जास्त लोक काम करत होते आणि अजूनही करत आहेत. पण 755 जणांना रशियातील आपलं कामकाज थांबवावं लागेल'' असं पुतिन म्हणाले. या शिवाय ''अमेरिकेसोबतचे संबंध दिर्घकाळ सुधारणार नाहीत'' असंही ते म्हणाले.  सप्टेंबरपर्यंत अमेरिकेने  राजनैतिक अधिका-यांची संख्या कमी करून 455 इतकी करावी अशी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापुर्वी मागणी केली होती. रशियाचेही इतकेच राजनैतिक अधिकारी अमेरिकेत कार्यरत आहेत.  ''आम्ही बरीच वाट पाहिली, परिस्थितीत सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण आता परिस्थितीत लवकर बदल होण्याची चिन्हं दिसत नाहीत'', असं म्हणत अमेरिकेसोबतचे संबंध दिर्घकाळ सुधारणार नाहीत असं रोसिया-24 सोबत बोलताना पुतिन म्हणाले.  अमेरिकेच्या सीनेटने गुरूवारी एका विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकात 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचं, तसंच 2014 साली क्रीमियावर मिळवलेल्या ताब्याचा उल्लेख असून याच्या विरोधात रशियावर अनेक निर्बंध लावण्याचं विधेयकात म्हटलं आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनीही पराभवास अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा(एफबीआय),  विकिलीक्स आणि रशीयाच्या हॅकर्सना जबाबदार धरलं होतं. न्यू यॉर्कमध्ये ‘वुमन फॉर वुमन इंटरनेशनल फोरम’ या कार्यक्रमात सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी जर 27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी तुमची राष्ट्रपती असती. पण असं झालं नाही.  28 ऑक्टोबरला एफबीआयचे संचालक जिम कॉमेचं पत्र आणि रशिया विकिलीक्सच्या मेलमुळे जे लोक मला मतदान करणार होते, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल या लोकांनी संशय निर्माण केला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मी 30 लाख मते जास्त घेतली होती. परंतु, नंतर इलेक्टोरेल मतदानात ट्रम्प विजयी झाले. प्रचारादरम्यान माझ्या वैयक्तिक इ-मेल्स हॅकिंगमागे रशियाची भूमिका आणि विकिलिक्सने एकामागोमाग माझ्याबाबतचे प्रकरणं सादर करण्याच्या वेळेत साधर्म्य असल्याबाबतही हिलरी यांनी शंका व्यक्त केली होती.