लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:26 IST2025-06-09T18:25:54+5:302025-06-09T18:26:28+5:30
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती उद्भवली नाही.

लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
संपूर्ण जगाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शहाणपण शिकवणाऱ्या अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये धकादायक घटना घडली आहे. येथे निदर्शन करणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला गोळी मारण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, ही गोळी पोलिसांनी चालवली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लॉस एंजेलिसमध्ये सध्या भयंकर अशांतता निर्माण झाली आहे.
रबरच्या गोळ्यांचे फायरिंग -
सध्या संपूर्ण लॉस एंजेलिसमध्ये अशांततेचे वातावरण आहे. पत्रकार लॉरेन टोमासी या लोकांच्या निदर्शनाचे रिपोर्टिंग करत होत्या. या दरम्यान पोलिसांनी तिच्या पायाला गोळी झाडली. यानंतर, त्या मोठ्याने ओरडल्या. पोलिसांची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी टोमासी म्हणाल्या, तासंतास उभे राहिल्यानंतर ही परिस्थिती आता वेगाने बिघडली आहे, एलएपीडी घोड्यावरून येत आहेत आणि निदर्शकांवर रबरच्या गोळ्या झाडत आहे. यानंतर टोमासी यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता, आपण सुरक्षित आहोत, असे उत्तर त्यांनी दिले. या घटनेनंतर, लॉरेन टोमासी आणि त्यांचा कॅमेरा ऑपरेटर दोघेही सुरक्षित आहेत, असे नाइन न्यूजने एका निवेदनात म्हटले आहे.
In LA, riot police shot an Australian journalist with a rubber bullet, apparently without provocation, as she was reporting from the scene. pic.twitter.com/CFtP92e9kS
— Pekka Kallioniemi (@P_Kallioniemi) June 9, 2025
अनेक दशकांपासून असे दृष्य दिसले नाही -
दोन दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने लॉस एंजेलिसमधील काही भागांत हद्दपारीसाठी छापे टाकण्यात आले. यानंतर काही लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे कॅलिफोर्नियातील राज्य सैन्यावर संघीय नियंत्रण घेण्याच्या मुद्द्यावरून हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती उद्भवली नाही.