शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आधी नाकातोंडातून रक्तस्राव, नंतर थेट मृत्यू; रहस्यमयी आजारामुळे एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 10:25 AM

रहस्यमयी आजारामुळे स्थानिक चिंतेत; चिनी कंपनीकडे संशयाची सुई

ठळक मुद्देइथिओपियातल्या गावांमध्ये रहस्यमयी आजाराची दहशतचिनी कंपनीतून सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे मृत्यू होत असल्याचा संशयइथिओपियात चिनी कंपनी करतेय गॅसवाहिनी टाकण्याचं काम

अद्दीस अबाबा: एकीकडे जवळपास संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसत असताना दुसरीकडे इथिओपियात एका रहस्यमयी आजारानं दहशत माजवलीय. आधी नाकातोंडातून रक्तस्राव आणि त्यानंतर थेट मृत्यू असे प्रकार इथिओपियातल्या गावांमध्ये घडताहेत. चिनी कंपन्यांकडून सुरू असलेल्या तेल उत्खननातून विषारी पदार्थ सोडले जात असल्यानं हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.सोमाली भागात असलेल्या वायू प्रकल्पाजवळील गावांमध्ये एका आजाराची साथ पसरलीय. या आजाराची बाधा झालेल्यांचे डोळे ताप येण्यापूर्वी पिवळे होत आहेत. त्यानंतर त्यांच्या शरीराला सूज येत असून थेट मृत्यू ओढावत आहे. तळव्यांचा रंग पिवळसर होणं, भूक कमी होणं, निद्रानाश अशी लक्षणंदेखील या आजाराच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. मात्र या भागातलं वातावरण राहण्यास अयोग्य असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. परिसरातली परिस्थिती सुयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. आजाराचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र परिसरातल्या पाण्यात रसायनं मिसळलं गेल्यानं हा प्रकार घडत असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. स्थानिक रहिवासी खादर अब्दी अब्दुल्लाही यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दल आरोप केला होता. परिसरात पसरलेल्या आजारासाठी त्यांनी पाण्यात सोडण्यात येणाऱ्या रसायनांना जबाबदार धरलं होतं. यानंतर अब्दुल्लाही यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आपण या आजारावर पुरेसे उपचार करू शकत नसल्याचं म्हणत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अनेकांसाठी जीवघेणा ठरलेला आजार आपल्यासाठी संपूर्णपणे नवा असल्याचा दावा सोमाली सरकारच्या सल्लागारानं केला. पॉली-जीसीएल कंपनी मानवी आरोग्यास हानिकारक रसायनं वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं. चिनी कंपनी पॉली-जीसीएलनं गेल्याच वर्षी इथिओपिया ते द्जीबौटी दरम्यान गॅसवाहिनी टाकण्याची घोषणा केली. इथिओपियातला गॅस लाल समुद्रापर्यंत वाहून नेण्याचं काम या गॅसवाहिनीच्या माध्यमातून केलं जाईल.  

टॅग्स :Deathमृत्यू