शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:21 IST

Vijay Mallya-Lalit Modi: ललित मोदी आणि विजय माल्याच्या लंडनमधील पार्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Vijay Mallya-Lalit Modi: सुमारे नऊ वर्षांपूर्वी भारतातून पळून गेलेला फरार विजय मल्ल्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक पॉडकास्ट समोर आला होता, ज्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्या पॉडकास्टची खूप चर्चा झाली. आता परत एकदा मल्ल्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, त्याने लंडनमध्ये आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदीसोबत केलेली ग्रँड पार्टी. 

हजारो कोटी रुपये घेऊन भारतातून पळून गेलेले हे लोक परदेशात कसे विलासी जीवन जगतात, हे यातून दिसून येते. ललित मोदी आणि विजय मल्ल्याच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पार्टी लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यात जगभरातून फक्त निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी खेळाडू ख्रिस गेल देखील या पार्टीत सामील होता.

जगभरातून 310 निवडक पाहुणे पार्टीला उपस्थित ललित मोदी यानेचा पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ललित मोदी आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या 'आय डिड इट माय वे' गाणे गाताना दिसतात. या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहितो, '310 मित्र आणि कुटुंबासह एक उत्तम रात्र...हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालणार, वादग्रस्तही ठरणार, परंतु मी हेच सर्वोत्तम करतो.'

ख्रिस गेलने पार्टीचा फोटो शेअर केला आरसीबीचा माजी स्टार ख्रिस गेलनेही विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेलने मल्ल्या आणि ललित मोदींसोबतचा फोटो पोस्ट करताना लिहिले की, "आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. एका अद्भुत संध्याकाळसाठी धन्यवाद."

विजय मल्ल्याला फरार घोषित विजय मल्ल्या 2016 मध्ये यूकेला पळून गेला होता, तेव्हापासून तो तिथेच राहत आहे. भारत सरकारने मल्ल्याला 2019 मध्ये फरार घोषित केले होते. त्याच्यावर 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने अलीकडेच पॉडकास्टमध्ये या आरोपांवर पहिल्यांदाच आपले मौन सोडले. त्याने म्हटले होते की, बँकांनी त्याच्याकडून सुमारे 14 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. 

ललित मोदीवर काय आरोप ?ललित मोदींवर शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. हे प्रकरण 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलशी संबंधित आहे. त्या काळात ईडीने ललित मोदीवर आयपीएल स्थलांतरित करण्यासाठी पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. ज्यासाठी ईडीने ललितवर 10.65 कोटी रुपयांचा दंडur ठोठावला होता. यासोबतच, त्याच्यावर फेमाचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता.

पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याLalit Modiललित मोदीChris Gayleख्रिस गेलRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरLondonलंडनfraudधोकेबाजी