शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मला भारतात आणण्याचा आटापिटा निव्वळ मतांसाठी! विजय मल्ल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:34 AM

भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.

लंडन: भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.ब्रिटिश फॉर्म्युला वन ग्रां प्री’ मोटारींच्या शर्यतीत मल्ल्याच्या मालकीचा ‘इंडिया वन’ संघ सहभागी होत आहे. शर्यतीच्या ठिकाणी आलेल्या मल्ल्याने एका वृत्तसंस्थेस सांगितले की, भारतातील तपासी यंत्रणा मला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करून घेऊन माझ्या मालमत्ता जप्त करण्याची धडपड करत आहेत. पण मी पळून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? आधीपासूनच माझे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे आणि मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे मी ब्रिटनमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे जाणार? तरीही मला पळपुटा ठरविण्याचे राजकारण केले जात आहे.भारतीय बँकांनी केलेल्या अर्जावर लंडनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटनमधील मालमत्तांची झडती घेण्यास अनुमती दिली आहे. त्याविषयी मल्ल्या म्हणाला की, ते खुशाल येऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की, बँका ज्या मालमत्तांबद्दल बोलत आहेत, त्या माझ्या नाहीत. लंडनच्या ग्रामीण भागातील आलिशान बंगला माझ्या मुलांचा आहे व लंडनमधील घर आईचे आहे. या मालमत्तांना ते हातही लावू शकत नाहीत. प्रश्न राहिला ब्रिटनमधील माझ्या मालमत्तांचा. काही मोटारी व काही रत्नाभूषणे एवढेच काय ते माझ्या नावावर आहे. त्या वस्तूंची यादी मी ब्रिटनमधील कोर्टात सादर केली आहे व हव्या तेव्हा स्वत: आणून देईन, तुम्ही तसदी घेण्याचीही गरज नाही, असेही कोर्टाला लिहून दिले आहे.भारतातील थकीत कर्जे वसूल करण्यासाठी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ माझ्या भारतातील मालमत्तांवरडोळा ठेवून आहेत. पण अशा दोन अब्ज डॉलरहून अधिक मालमत्तांची यादी मी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे आधीच दिलेली आहे. त्या मालमत्ता कर्जे फेडूनही शिल्लक राहतील एवढ्या आहेत. त्या विकण्यास काहीच अडचण नाही. शिवायमीही पैसे उभे करण्यासाठी आणखी काही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ब्रिटनमधील किंवा इतर ठिकाणच्या मालमत्ता कर्जफेडीत आणण्याचा प्रश्नच येत नाही. (वृत्तसंस्था)हा घोर अन्यायमी या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे व त्यासाठी त्यांना ‘मनी लॉड्रिंग’ कायद्याचा आधार घेतला आहे, पण हे करताना ‘ईडी’ने मला वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तांवरही टांच आणली आहे. त्यातील काही सन १९२० पासूनच्या आहेत. हा घोर अन्याय आहे.-विजय मल्ल्या, माजी ‘किंग आॅफ गूड टाइम्स’

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याnewsबातम्या