Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 19:15 IST2025-05-30T19:14:07+5:302025-05-30T19:15:45+5:30
थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर किंगडम येथे एका पर्यटकाचा जीव केवळ एका सेल्फीमुळे धोक्यात आला.

Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...
थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर किंगडम येथे एका भारतीय पर्यटकाचा जीव केवळ एका सेल्फीमुळे धोक्यात आला. वाघासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात त्या माणसावर वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरुण वाघासोबत चालताना आणि त्याच्याजवळ बसून फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावेळी एक प्रशिक्षक वाघाला काठीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काही क्षणांतच वाघ अचानक आक्रमक झाला आणि त्याने त्या व्यक्तीवर झडप घातली. व्हिडीओत तरुणाचा घाबरलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो आहे.
पर्यटकांची सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!
ही घटना समोर आल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, टायगर किंगडमसारख्या प्राण्यांसोबत थेट भेट घडवणाऱ्या पर्यटन स्थळांवर प्राण्यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
pic.twitter.com/3ol0TrRieE
— Trinetra | तांडव ही उत्तर है (@Nitinrajpu66462) May 30, 2025
This is heartbreaking — not just for the man attacked, but for the tiger too.
Tigers are not selfie props.
Keeping apex predators in cages, sedating them, and turning them into “tourist entertainment” is inhumane, unsafe, and unethical.
Thailand has…
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत विचारले की, “तो तरुण सुरक्षित आहे का?” या प्रश्नाला उत्तर देताना व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने सांगितले की, “तो ठीक आहे, पण त्याला केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत.”
वाघाच्या वागणुकीमागचं कारण काय?
वाघ अचानक आक्रमक का झाला, याचा अंदाज बांधताना एका युजरने म्हटले की, “प्राण्यांना शरीराच्या पाठीमागच्या भागाला हात लावणे आवडत नाही. त्या माणसाने वाघाला सतत त्या भागावरून मिठी मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाघ चिडला असावा.”
मात्र, या घटनेनंतर टायगर किंगडमसारख्या संस्थांमध्ये प्राण्यांशी होणाऱ्या वागणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेकजण असा आरोप करतात की, पर्यटकांसोबत वाघ शांत राहावे म्हणून त्यांना औषधं दिली जातात, उपाशी ठेवले जाते, किंवा कठोर प्रशिक्षण दिलं जातं. आता अनेक जण यावर टीका देखील करत आहेत.