Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:38 PM2021-09-09T19:38:38+5:302021-09-09T19:42:43+5:30

Terrible fire in car: रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Video: running car suddenly set on fire, old couple stuck in it, see what happened next | Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं...

Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं...

Next

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लेकसाइडमध्ये एका भीषण अपघात झाला. हायवेवर धावत्या कारने अचानक पेट घेतला. या जळत्या कारमध्ये वृद्ध जोडपं अडकलं. सुदैवाने, रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्या जोडप्याला कारमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरील एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

लेकसाइड फायर डिस्ट्रिक्टने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका कारमध्ये आगीचा प्रचंड भडका झालेला दिसत आहे. या जळत्या कारमध्ये एक जोडपं होतं, त्यांना बाहेर निघता आलं नाही. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी तत्परता दाखवत त्या जोडप्याला बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवला. दरम्यान, या गाडीने पेट का घेतला, याची माहिती मिळू शकली नाही.

जीव वाचवणाऱ्यांचे कौतुक
7 सप्टेंबरला शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला 2,000 पेक्षा जास्त लाइक्स आणि मिळाले आहेत. तसेच, कमेंट्समध्ये अनेकजण त्या वृद्ध जोडप्याला वाचवणाऱ्या लोकांचे कौतुक करत आहेत.
 

 

Web Title: Video: running car suddenly set on fire, old couple stuck in it, see what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.