शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 15:42 IST

मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला.

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. मात्र आता चीनने मसूद अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही यावर चर्चा करत आहोत असं सांगितले. 

भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितले की, मसूद अजहर प्रकरण चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूज अजहर प्रकरणावर चर्चा करत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूद अजहरबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली चिंता आम्हाला माहिती आहे असं त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र संघात चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी नाराजी दाखवली. चीन जर या प्रकरणावर गंभीरतेने विचार करत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल असं अमेरिकेने सांगितले होते. चीनचे म्हणणं आहे की, मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला.

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला होता. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं, फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अजहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता. 2017 सालीही चीनने अशाप्रकारे प्रस्तावाला विरोध केला होता. गेल्या 10 वर्षातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा हा चौथा प्रस्ताव आहे  

अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूदअनेक वर्षापासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जैशच्या संस्थापकावर बंदी आणली जात नाही. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. जानेवारी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यसाठी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या होत्या. यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला मात्र चीनने विरोध केला होता. 

पाहा व्हिडीओ 

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाchinaचीनmasood azharमसूद अजहरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ