VIDEO : अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात लागली आग, सात जण जखमी
By Admin | Updated: October 29, 2016 09:38 IST2016-10-29T08:46:07+5:302016-10-29T09:38:53+5:30
मियामी शहराकडे रवाना होत असताना अमेरिकन एअरलाइन्सच्या जेटलायनर विमानामध्ये आग लागल्याची घटना घडली.

VIDEO : अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात लागली आग, सात जण जखमी
ऑनलाइन लोकमत
शिकागो, दि. 29 - मियामी शहराकडे रवाना होत असताना अमेरिकन एअरलाइन्सच्या जेटलायनर विमानामध्ये आग लागल्याची घटना घडली. शिकागो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरुन उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी विमानात कर्मचा-यांसह 170 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने प्रवाशांना सुरक्षित विमानातून बाहेर काढण्यात आले. मात्र, यादरम्यान सात जण किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती एअरलाईन्सच्या अधिका-यांनी दिली आहे.
विमानाच्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विमान उड्डाण करत असताना अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला, यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येऊ लागले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डकडून सांगण्यात येत आहे.
Video from Tarmac at O'Hare in Chicago. Black smoke and bright flames. pic.twitter.com/sCgiHvdaQu
— Michelle Malkin (@michellemalkin) October 28, 2016