शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

१३,०००% चलनवाढ, एक कप कॉफीसाठी द्यावा लागतो संपूर्ण महिन्याचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 8:25 PM

व्हेनेझुएलाची आताची पिढी ज्या महागाई आणि चलनवाढीला सहन करत आहे तशी परिस्थिती कोणीच पाहिली नसेल.

कॅराकस- काय ही महागाई, आमच्यावेळेस दहा रुपयात सगळ्या वस्तू यायच्या, आता सगळं महाग झालंय असं म्हणणारे लोक आपल्याकडे प्रत्येक पिढीत दिसतात. पण व्हेनेझुएलाची आताची पिढी ज्या महागाई आणि चलनवाढीला सहन करत आहे तशी परिस्थिती कोणीच पाहिली नसेल. एक कपभर कॉफी किंवा पावाची लादी घेण्यासाठी इथल्या लोकांवर एका महिन्याचा पगार खर्च करावा लागत आहे. काहा लोकांनी तर पाव विकत घेण्यासाठीही क्रेडिट कार्डाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्हेनेझुएलाच्या चलनवाढीचा दर १३,००० % होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांच्या समाजवादी सरकारच्या काळामध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल १०० च्या वर गेले होते त्यामुळे तेलउत्पादक व्हेनेझुएलाला चांगलेच उत्पन्न मिळाले. मात्र २०१४ पासून तेलाचे दर कोसळले. त्यानंतर देशाला उभ्या करणाऱ्या एकाधिकारशहा चावेज यांचे निधन झाले. आधीच कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेची स्थिती निर्नायकी झाली. चावेज यांचे वारस निकोलस मडुरो प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याने देशाची स्थिती अधिकच बिघडली, राजकीय अस्थिरताही निर्माण झाली. गेल्या चार वर्षांमध्ये व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेने मान वर काढलीच नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने लोकांवर उपाशी राहाण्याची वेळ आलीच व चलनवाढीमुळे असंतोषही निर्माण झाला.  अर्जेंटिनामध्ये २०१६ साली चलनवाढीचा दर ४७% वर गेला होता मात्र तेथिल परिस्थिती आता सुधारत आहे.

चलनवाढीत व्हेनेझुएलानंतर दक्षिण सुदानचा नंबर लागतो तेथे ४७६.०२ चलनवाढ आहे. त्यानंतर सुरिनाम ६७.११% , अंगोला ३३.६८%, मालावी १९.७८% यांचा नंबर लागतो..