शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सीरियन स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू जप्त होणार

By admin | Updated: January 27, 2016 17:35 IST

सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे

डेन्मार्कचा वादग्रस्त कायदा: जगभरातून टीका
कोपनहेगन: देश सोडून वर्ष होत आले तरी सीरियन स्थलांतरितांच्या हाल- अपेष्टांमध्ये कोणतीही घट होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे. यानुसार स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (१३४० युरो, १००० पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.
गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये २१,००० स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे. डेन्मार्कच्या संसदेत ८१ विरुद्ध २७ अशा मतांनी यास मंजूरी मिळाली. या कायद्यानुसार लग्नाची, साखरपुड्याची अंगठी, चित्रे, सजावटीच्या वस्तू, बक्षीस-पदके स्थलांतरितांना आपल्या जवळ बाळगता येणार आहेत. मात्र घड्याळ, मोबाइल, कॉम्प्यूटर्स जप्त केले जाऊ शकतात. स्थलांतरिताचा आमच्या देशावर येणारा ताण भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचलावे लागत असल्याचे डेन्मार्कने म्हटले आहे. डेन्मार्क संसदेच्या या कृतीवर जगभरातून टीका होत असून युनोचे सरचिटणीस बान की मून यांनीही डेन्मार्कचा निषेध केला आहे. काही टीकाकारांनी या कायद्याची दुस-या महायुद्धा युरोपात ज्यू लोकांवर ओढावलेल्या परिस्थितीशी केली आहे. डेन्मार्कवर आता टीका होत असली तरी असे करणारा तो पहिला देश नाही. स्वित्झर्लंडने याआधीच स्थलांतरितांकडून पैसे काढून घेतलेले आहेत. ११२ स्थलांतरितांकडून २,१०,००० स्वीस फ्रँक्स त्यांनी गोळा केलेले आहेत तर नेदरलँडसने प्रतीव्यक्ती ५,८९५ युरो व प्रती कुटुंब ११,७९० युरो खर्चापोटी वसूल केलेले आहेत.
 
जर्मनी देणार रोजगार
 
सीरियन स्थलांतरित गेल्या दोन वर्षात सर्वाधीक संख्येने जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. त्यांना तात्पुरते रोजगार देण्याची सोय जर्मनीने केली आहे. यानुसार मध्यपूर्वेत अडकलेल्या सीरियन तसेच जॉर्डनच्या नागरिकांनाही रोजगार उपलब्ध  होणार आहेत पाच लाख रोजगारांसाठी २०० दशलक्ष युरोंची तरतूद जर्मनी करणार असून प्रतीमहिना ३०० युरो प्रत्येकास मिळतील अशी योजना यामध्ये करण्यात येत आहे.