पश्चिम आशियातील युद्ध आता केवळ दोन देशांपुरते उरले नसून, इतर आखाती देश यात थेट ओढले गेले आहेत. इराणविरुद्धच्या 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' दरम्यान ३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे, इराणने अमेरिकेची महाकाय युद्धनौका 'USS अब्राहम लिंकन' वर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला असून समुद्रात मोठे रणकंदन माजले आहे.
युद्धातील सर्वात मोठे अपडेट्स१. अमेरिकन सैनिकांचा बळी: अमेरिकन सेंट्रल कमांडने पुष्टी केली आहे की, इराणमधील लष्करी मोहिमेदरम्यान त्यांच्या ३ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतरच त्यांची नावे जाहीर केली जातील.
२. अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर 'USS अब्राहम लिंकन' ला लक्ष्य करत ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात युद्धनौकेचे किती नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने हा हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
३. १५ भारतीय खलाशी संकटात: इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मध्ये 'स्कायलाईट' नावाच्या ऑइल टँकरवर हल्ला केला आहे. या टँकरवर एकूण २० कर्मचारी असून, त्यापैकी १५ भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत भारत सरकारने चिंता व्यक्त केली आहे.
४. इराणची २ फायटर जेट्स पाडली: इस्रायली संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांनी इराणची दोन लढाऊ विमानांना हवेतच मारून पाडले आहे. ही विमाने इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत होती.
Web Summary : Iran claims striking the USS Abraham Lincoln with missiles. Three American soldiers died during 'Operation Epic Fury'. Fifteen Indian sailors are in danger after an attack on an oil tanker. Israel downed two Iranian fighter jets.
Web Summary : ईरान ने यूएसएस अब्राहम लिंकन पर मिसाइल से हमला करने का दावा किया है। 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' के दौरान तीन अमेरिकी सैनिक मारे गए। तेल टैंकर पर हमले के बाद पंद्रह भारतीय नाविक खतरे में हैं। इजरायल ने ईरान के दो लड़ाकू विमानों को मार गिराया।