चीनचा बहुजातीय वसाहतीचा प्रयोग
By Admin | Updated: September 16, 2014 01:51 IST2014-09-16T01:51:33+5:302014-09-16T01:51:33+5:30
शिनजियांग या अस्वस्थ व हिंसाचाराने त्रस्त झालेल्या भागातील निजर्न ग्रामीण भागात बहुजातीय समुदायांची वसाहत करणार आहे.

चीनचा बहुजातीय वसाहतीचा प्रयोग
बीजिंग : शिनजियांग या अस्वस्थ व हिंसाचाराने त्रस्त झालेल्या भागातील निजर्न ग्रामीण भागात बहुजातीय समुदायांची वसाहत करणार आहे. मुस्लिम उघीर व हान समुदायात वैवाहिक संबंध प्रस्थापित व्हावेत व त्यातून सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी व पर्यायाने दहशतवादी कारवायांना पायबंद बसेल, असा सरकारचा विचार आहे. अर्थात अशा बहुजातीय वसाहतीचा प्रयत्न हा प्रायोगिक तत्त्वावर असेल.
शिनजियांग अकादमी ऑफ सोशल सायन्सेसचे प्राध्यापक ली शियाओशिया यांनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ ला सांगितले की, शिनजियांगच्या होतान शहरात 95 टक्के लोकसंख्या उघीर समुदायाची आहे, म्हणून ही बहुजातीय वसाहत तयार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. 1.1क् कोटी उघीर लोकसंख्येच्या शिनजियांग प्रांतात गेल्या काही वर्षात हिंसाचार वाढला आहे.
शिनजियांगमध्ये बाहेरून आलेल्या हान वंशाच्या समुदायाच्या वाढत्या वसाहतीचा राग म्हणून अस्वस्थता आहे. अल कायदासमर्थक ‘ईस्ट तुर्कस्थान इस्लामिक मूव्हमेंट’ (ईटीआयएम) शिनजियांगला चीनपासून वेगळे काढण्याच्या प्रयत्नात आहे. ईटीआयएम शिनजियांग प्रांतात सक्रिय झाली असून त्याने प्रांतात, तसेच बाहेर मोठे हिंसक हल्ले
केले आहेत. शिनजियांग प्रांताची सिमी ही पाकव्याप्त काश्मीर, अफगाणिस्तान आणि काही मध्य आशियाई देशांना लागून
आहे. (वृत्तसंस्था)