शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

बलात्कारांच्या घटनांमुळे काश्मीरला जाणं टाळा, अमेरिकी नागरिकांसाठी नवीन पर्यटन सूचनावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:50 AM

अमेरिकेने भारतात जाणा-या आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये (अॅडव्हायजरी) भारताची बदनामी होत असल्याचं दिसत आहे.

वॉशिंग्टन -  अमेरिकेने भारतात जाणा-या आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये (अॅडव्हायजरी) भारताची बदनामी होत असल्याचं दिसत आहे. ज्यांना भारतात पर्यटनासाठी जायचे आहे, त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाणे टाळावे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.  श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटले आहे. विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

10 जानेवारीला अमेरिकेनं आपली नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात भारताला दुस-या स्तरावर तर पाकिस्तानला तिस-या स्तरावर ठेवण्यात आले आहे. अमेरिकेत स्तराच्या आधारे अन्य देशांना सुरक्षिततेसंदर्भाचे अनुमान लावले जातात व यावरुन अमेरिकी नागरिकांना त्यावर सतर्क केले जाते. 

अमेरिकी नागरिकांसाठी काय आहेत नेमक्या सूचना?- दहशतवादी कारवाया आणि काश्मिरी लोकांचा उद्रेक पाहता जम्मू काश्मीरला (लेह-लडाख वगळता) भेट देणे टाळावे.- भारत-पाकिस्तान सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात सातत्यानं लष्करी कारवाया होत आहेत, तिथून प्रवास टाळावा.- महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी- भारतात बलात्काराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे महिलांनी अधिक काळजी घ्यावी- अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना सेव्हन सिस्टर्स अर्थात आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या सात राज्यांमध्ये जाण्याची परवानगी नाही. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाtourismपर्यटन