शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 19:38 IST

अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला.

बीजिंग- अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला. चीननं रविवारी अमेरिकेच्या दोन युद्धनौकांना दक्षिण चिनी समुद्रात पाहिलं असल्याचा दावा केला. चीन दावा करत असलेल्या क्षेत्रातून अमेरिकेच्या युद्धनौकांनी प्रवास केल्यानं चीनला संताप अनावर झालाय. परंतु अमेरिकेला या कृत्याचा उत्तर कोरिया प्रकरणात फटका बसू शकतो.गेल्या काही दिवसांपासून चीन दावा करत असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं युद्धनौका उतरवून चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचीही चर्चा आहे. समुद्री क्षेत्रात चीन करत असलेल्या दादागिरीला जरब बसवण्यासाठीच अमेरिकेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या युद्धनौकांमध्ये अण्वस्त्र नाशक आणि अण्वस्त्रवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. अमेरिकेनं स्वतःच्या नौदलाचा महत्त्वाच्या भाग असलेल्या या नौका दक्षिण चिनी समुद्रात उतरवल्यानं चीनसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या युद्धनौका चीनच्या आयलंडपासून अवघ्या 12 नॉटिकल लांब आहेत. या क्षेत्रावरून चीनचा शेजारील राष्ट्रांशी वादही सुरू आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांच्याशी अमेरिकेची चर्चा रद्द झाल्यानं अमेरिका आणि चीनच्या संबंधात कटुता आलीय.अशातच अमेरिकेच्या युद्धनौकांनी चीनच्या समुद्रात प्रवेश करणं हे तणावपूर्ण स्थितीला निमंत्रण देण्यासारखाच प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही दक्षिण चिनी समुद्रातील याच वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनला संताप अनावर झाला होता. त्यावेळी अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला होता. तसेच चीनच्या वाढत्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी एकेकाळचे कट्टर वैरी असलेले अमेरिका आणि व्हिएतनाम हे दोन देश जुनं शत्रुत्व विसरून एकत्र आले होते.दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे.  इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एक प्रकारे पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. 

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्र