अमेरिकेच्या युद्धनौकेची मालवाहू जहाजाशी धडक

By Admin | Updated: June 17, 2017 23:18 IST2017-06-17T23:18:32+5:302017-06-17T23:18:32+5:30

मालवाहू जहाजाशी धडक झाल्यानंतर यूएसएस फिट््सगेराल्ड या अमेरिकेच्या युद्धनौकेतील (क्षेपणास्त्र विनाशिका) ७ नौदल कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.

US warships hit by cargo ship | अमेरिकेच्या युद्धनौकेची मालवाहू जहाजाशी धडक

अमेरिकेच्या युद्धनौकेची मालवाहू जहाजाशी धडक

तोक्यो : मालवाहू जहाजाशी धडक झाल्यानंतर यूएसएस फिट््सगेराल्ड या अमेरिकेच्या युद्धनौकेतील (क्षेपणास्त्र विनाशिका) ७ नौदल कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जपानच्या योकोसुका किनाऱ्यापासून ४५ सागरी मैल अंतरावर प्रशांत महासागरात शनिवारी ही दुर्घटना घडली.
यात युद्धनौकेचे कमांडर ब्राईस बेन्सन यांच्यासह तीन जण जखमी झाले असून, त्यांना योकोसुका येथील अमेरिकी नौदल रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे लष्कराने सांगितले. युद्धनौकेतील ७ नौदल कर्मचारी बेपत्ता असून, जपानी तटरक्षक दल त्यांचा शोध घेत आहेत. युद्धनौका आणि फिलिपाईन्सचे मालवाहू जहाज एसीएक्स क्रिस्टल यांची स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे अडीच वाजता धडक झाली.

Web Title: US warships hit by cargo ship