शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

धक्कादायक! ट्रम्प यांच्या धोरणाच्या भीतीने ११ वर्षांच्या निरागस मुलीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 22:29 IST

US Policies, texas girl suicide: अवघ्या ११ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत असं काय घडलं, तिने असा निर्णय का घेतला? जाणून घ्या.

US Policies, texas girl suicide: अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका ११ वर्षांच्या निष्पाप मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की शाळेत तिला तिच्या कुटुंबाच्या इमिग्रेशन स्टेटसबद्दल सतत टोमणे मारले जात होते. तिच्या शाळेतील वर्गमित्रांनी तिला चिडवले होते आणि धमकी दिली होती की तिच्या पालकांना अमेरिकेतून हद्दपार केले जाईल आणि ती इथे एकटी पडेल. या मानसिक ताणातून आणि भीतीमुळे ११ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्ट्समधील दाव्यानुसार, टेक्सासमधील जोसेलिन रोजो कॅरांझा नावाच्या मुलीला शाळेत सतत त्रास दिला जात होता. तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी तिच्या कुटुंबाच्या इमिग्रेशन स्टेटसवरून तिला त्रास दिल्याचा आरोप आहे. मुलांनी तिला घाबरवले की तिच्या पालकांना बेड्या घालून देशाबाहेर पाठवले जाईल आणि तिला या देशात एकटीलाच राहावं लागेल. या मानसिक छळाला बळी पडून जोसेलिनने ८ फेब्रुवारीला टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

आईला शाळेतील प्रकाराची कल्पनाच नाही...

जोसेलिनची आई मार्बेला कॅरांझा म्हणाली की तिला तिच्या मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची काहीच माहिती नव्हती. माझ्या मुलीने कधीही असे कोणतेही संकेत दिले नाहीत की ती इतकी तणावात आहे. शाळेत तिला त्रास दिला जात आहे हे मला कधीच माहित नव्हते. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा मला कळले की जोसेलिन शाळेत समुपदेशन (काउन्सेलिंग) घेत आहे, परंतु शाळा प्रशासनाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

शाळा प्रशासनावर उपस्थित झाले प्रश्न

जोसेलिनच्या आत्महत्येनंतर शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तिच्या आईचा आरोप आहे की शाळेला याची माहिती होती पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी गेन्सविले इंडिपेंडेंट स्कूल जिल्हा पोलिसांकडून केली जात आहे. शाळा प्रशासनाने सांगितले की ते छळाच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि अशा तक्रारी ते गांभीर्याने घेतात, परंतु जोसेलिनच्या प्रकरणात कोणतेही ठोस विधान जारी करण्यात आलेले नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिका