शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत? ISनं जारी केली ऑडिओ क्लिप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 8:23 AM

सीरिया, इराकमध्ये क्रौर्याचा कळस गाठणा-या इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीच्या मृत्यूबाबतचे गूढ अजूनही कायम आहे.

वॉशिंग्टन - सीरिया, इराकमध्ये क्रौर्याचा कळस गाठणा-या इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीच्या मृत्यूबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. बगदादी ठार झाल्याची बातमी वारंवार समोर येते, पण त्याचवेळेस बगदादी जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. आताही बगदादीसंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, यावरुन तो ठार झाला आहे की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. पण या ऑडिओ क्लिपची विश्वासार्हता तपासून पाहण्यासाठी युनायडेट स्टेट्सचे गुप्तचर विभागानं काम सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर विभागचं असे म्हणणे आहे की, बगदादीसंदर्भातील ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जर ही क्लिप खरी असेल तर बगदादी अजूनही जिवंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ISशी संबंधित असलेल्या न्यूज ऑर्गनायझेशन अल-फुरकानच्या माध्यमातून 46 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. ज्यात इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.  या ऑडिओ क्लिपमध्ये बगदादीनं इसिसच्या दहशतवाद्यांना धर्मनिंदकांविरोधात कारवाई करण्यासाठी आवाहन केल्याचे म्हटले जात आहे.  

अमेरिकेच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसनं जारी केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत चौकशी सुरू आहे. या क्लिपच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित करण्यासारखी ठोस अशी माहिती मिळू शकलेली नाही, पण क्लिप खरी असल्याचाही पुरावा अद्यापपर्यंत समोर आलेला नाही.   

वारंवार आल्या बगदादी ठार झाल्याच्या बातम्याजून 2016दरम्यान, जून 2016 मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, अमेरिका किंवा इतर देशांकडून याला दुजोरा मिळू शकला नव्हता. ओसामा बिन लादेननंतरचा जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबू बकरवर १६० कोटी रुपयांचे बक्षीस आहे. नाटोने इसिसचा सीरियातील बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये केलेल्या हल्ल्यात अबू मारला गेल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते.  जुलै 2017 सीरियामधील निरीक्षक गटाने सूत्रांच्या हवाल्याने अबू बकर अल बगदादी ठार झाल्याचा दावा केला होता. सीरियामध्ये मानवी हक्कासाठी हा निरीक्षकांचा गट कार्यरत आहे. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. निरीक्षकांचा हा गट सीरियामधील गृहयुद्धावर विश्वसनीय माहिती देण्यासाठी ओळखला जातो. सीरियाच्या पूर्वेकडे असणा-या डायर-अल-झोर शहरातील सूत्रांच्या हवाल्याने निरीक्षकांच्या गटाने बगदादी ठार झाल्याचे म्हटले आहे. पण तो कधी मारला गेला ते निरीक्षकांच्या गटाने स्पष्ट केलेले नव्हते.  मे 2017 महिन्याच्या शेवटी रशियानेही बगदादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला होता. रशियाला इसीसच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला अशी अधिकृत माहिती मंत्रालयाने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली होती.  8 मे रोजी इसिसच्या प्रमुखांमध्ये होणा-या बैठकीची जागा आणि वेळ माहिती करुन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यानंतर रात्री 12.30 ते 12.45 दरम्यान हवाई दलाने ज्या ठिकाणी बैठक सुरु होती त्या कमांड पॉईंटवर हवाई हल्ला केला", अशी माहिती मंत्रालयाने दिली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी देखील उपस्थित होता. या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे अशी माहिती होती. हल्ल्यात इसीसचे अनेकजण ठार झाले होते. जवळपास 30 फिल्ड कमांडर्स आणि 300 पर्सनल गार्ड ठार झाले असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला