अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:49 IST2025-04-11T11:46:58+5:302025-04-11T11:49:26+5:30
भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?
अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादल्यानंतर चीनच्या जिनपिंग सरकारचे धाबे दणाणले आहेत. ते भारताकडे मदतीची याचना करत आहे. यावर पाकिस्तानी महिला युट्यूबर सना अमजदने तेथील काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रश्न केला की, चीनहापाकिस्तानचा सर्वात चांगला मित्र आहे, मात्र तो या कठीण काळात भारताकडे बघत आहे. यावर काय बोलाल? यावर एक व्यक्ती म्हणाली, मला वैयक्तिकरित्या डोनाल्ड ट्रम्प अत्यंत आवडतात. मात्र सध्या, ते घेत असलेले निर्णय खरोखरच धक्कादायक आहेत. भारत आणि चीनसंदर्भात बोलायचे झाल्यास, दोन्ही देशांमध्ये चांगला व्यापार होतो. हे लक्षात घेता, हे दोन्ही देश एकत्र आले, तर अमेरिकेसाठी अडचण निर्माण होऊ शकते.
ही पाकिस्तानी व्यक्ती पुडे म्हणाली, भारत आणि चीनची लोकसंख्या 100 कोटींहूनही अधिक आहे. यामुळे हे दोन्ही देश अमेरिकेविरोधात एकत्र आले, तर हा डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव असेल. आज, अनेक युरोपीय देशही अमेरिकेविरोधात जात आहेत. मात्र, हे अमेरिकेला अपेक्षित नाही. येणाऱ्या 10 वर्षांत चीन जगातील सुपर पॉवर बनेल, अशी भीती अमेरिकेला आहे. यामुळे ते केवळ चीनलाच टार्गेट करत आहेत.
काय म्हणाले चिनी दूतावासाचे प्रवक्त्ये -
भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने चीनवर लादलाय जबरदस्त टॅरीफ -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला चीन विरोधात 34 टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर 34 टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर 104 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ 34 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, 10 एप्रिलपासून लागू झाला. यानंतर अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवून तो 125 टक्के केला. याशिवाय, अमेरिकेने 75 देशांवर लादलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.