शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन पाणबुडीचा श्रीलंकेजवळ इराणी युद्धनौकेवर हल्ला; ८७ ठार, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच असा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:14 IST

अमेरिका म्हणते, इराणला वाटत होते आंतरराष्ट्रीय समुद्रात ते मोकळेपणाने वावरू शकतात..; भारतासाठी महत्त्वाचे... भारतात नुकताच सराव करून परतणाऱ्या युद्धनौकेला केले गेले टार्गेट

कोलंबो : अमेरिका-इराणयुद्ध आता भारताच्या अगदी जवळ येऊन पोहोचले असून, श्रीलंकेतील गाले शहराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकी पाणबुडीने टार्पेडोद्वारे इराणच्यायुद्धनौकेवर हल्ला केला. ही युद्धनौका भारतातून इराणमध्ये परतत होती. त्यावर असलेल्या  इराणच्या नौदलाच्या १८० नौसैनिकांपैकी ८७ जण ठार झाले असून, ३२ नौसैनिकांना वाचविण्यात यश आले. इतर बेपत्ता नौसैनिकांचा श्रीलंका नौदलाकडून शोध घेण्यात येत आहे. 

ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. परत जाताना दक्षिण श्रीलंकेतील गाले शहरापासून सुमारे ४० नॉटिकल मैल (सुमारे ७५ किलोमीटर) अंतरावर असताना हा हल्ला झाला.  टार्पेडोने हल्ला करून युद्धनौका बुडविल्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना आहे.श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ यांनी संसदेत सांगितले की, बुधवारी सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी आयआरआयएस डेना नावाची युद्धनौका बुडत असल्याची माहिती श्रीलंका नौदल आणि कोस्ट गार्डला मिळाली. त्यानंतर तातडीने बचावकार्यास सुरुवात झाली. 

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनी सांगितले, अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर हल्ला करून ती बुडवली. श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका सम्पथ म्हणाले की, इराणच्या नौदलाच्या युद्धनौकेभोवती तेलाचा मोठा तवंग आढळून आला. (वृत्तसंस्था)

होर्मुझ सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची वाहतूक ९०% घटली

लंडन : इराणवरील हल्ल्यांनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांची वाहतूक सुमारे ९० टक्क्यांनी घटल्याचे ऊर्जा बाजार विश्लेषक संस्था क्प्लेरने सांगितले.  जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेलाची या मार्गाने वाहतूक होते. इराणी अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखल्याचा दावा केला असला तरी काही जहाजे एआयएस  ट्रॅकिंग प्रणाली बंद ठेवून धोकादायक मार्गाने प्रवास करत असल्याचे क्प्लेरचे विश्लेषक मॅट राईट यांनी नमूद केले.

युद्धाचे परिणाम जाणून घ्या एका वाक्यात...गुजरातमधील मोरबी येथील प्रसिद्ध सिरेमिक (माती आणि टाइल्स) उद्योग पुढील काही दिवसांत पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे बुधवारी रुपया ६७ पैशांनी घसरून ९२.१६ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला.होर्मुझ सामुद्रधुनीत भारताची ३८ जहाजे अडकून पडली. त्यामुळे भारताची १० हजार कोटींची मालमत्ता धोक्यात. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Submarine Attacks Iranian Warship Near Sri Lanka; Dozens Dead

Web Summary : An American submarine attacked an Iranian warship near Sri Lanka, resulting in 87 deaths. The ship was returning from India. Oil tanker traffic through Hormuz Strait plummeted after the attack, impacting Indian assets and the Morbi ceramic industry.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धAmericaअमेरिका