US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:10 IST2025-12-11T09:08:41+5:302025-12-11T09:10:50+5:30
US Seizes Oil Tanker off the Coast of Venezuela: सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यात अमेरिकन लष्कराचे जवान हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरताना दिसत आहेत.

US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
व्हेनेझुएलासोबतचे संबंध ताणले गेले असतानाच अमेरिकेच्या लष्कराने मोठी कारवाई केली. व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात अमेरिकेने तेलाचे मोठे जहाज जप्त केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० डिसेंबर रोजी या लष्करी कारवाईची माहिती दिली. एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे, ज्यात अमेरिकेच्या लष्कराच्या जवान हे एका हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरताना दिसत आहेत.
अमेरिकेने आपल्या लष्कराला पाठवून व्हेनेझुएलाच्या समुद्रकिनाऱ्यावर ही कारवाई केली आहे. तेल वाहतूक करणारे जे जहाज जप्त करण्यात आले आहे, त्यावर बंदी घालण्यात आलेली होती. ट्रम्प यांनी हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध ड्रग्ज तस्करीवरून प्रचंड ताणले गेले आहेत.
हेलिकॉप्टरमधून उतरले जहाजामध्ये शिरले
अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे जवान जहाज जप्त करताना दिसत आहेत.
हेलिकॉप्टरमधून जवान जहाजापर्यंत पोहोचले. सशस्त्र जवान हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरताना दिसत आहेत. रायफल घेऊन जवान जहाजामध्ये जातात.
हेलिकॉप्टर से ऐसे उतरे तेल टैंकर पर
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) December 11, 2025
U.S. सैनिकों ने वेनेज़ुएला के तट के पास एक बैन किए गए तेल टैंकर पर धावा बोलकर उसे ज़ब्त कर लिया है।
इसका इस्तेमाल बैन किए गए वेनेज़ुएला और ईरान के तेल को ट्रांसपोर्ट करने के लिए किया जा रहा था। ट्रंप का कहना है कि U.S. ज़ब्त किए गए टैंकर से… pic.twitter.com/Uhlr6QrpLI
ट्रम्प या कारवाईबद्दल काय म्हणाले?
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते तेलाचे जहाज जप्त करण्याच्या कारवाईबद्दल म्हणाले, "आम्ही आताच व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर एक टँकर (जहाज) जप्त केले आहे. एक खूप मोठे जहाज आहे. खरं सांगायचं तर जप्त करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या जहाजांमध्ये सर्वात मोठे जहाज. इतरही काही गोष्टी होत आहेत. त्यामुळे तुम्ही त्या नंतर बघू शकाल."
अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी म्हणाले की, "हे जहाज अवैध तेल वाहतूक नेटवर्कचा भाग होते. याचा वापर व्हेनेझुएला आणि इराणचे बंदी घालण्यात आलेले तेल वाहून नेण्यासाठी केला जात होता."
अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले आहे की, हे तेल जहाज अमेरिकेचा एका विरोधी देश क्युबाकडे जात होते. हे जहाज अमेरिकेच्या लष्कराने जप्त केले.