पाकिस्तानच्या सात संस्थांवर अमेरिकेचे निर्बंध

By Admin | Updated: January 1, 2017 01:15 IST2017-01-01T01:15:16+5:302017-01-01T01:15:16+5:30

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या सात पाकिस्तानी संस्थांवर अमेरिकेने व्यापारी निर्बंध लादले आहेत, असे वृत्त ‘डॉन’ने दिले.

US restrictions on seven institutions in Pakistan | पाकिस्तानच्या सात संस्थांवर अमेरिकेचे निर्बंध

पाकिस्तानच्या सात संस्थांवर अमेरिकेचे निर्बंध

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या सात पाकिस्तानी संस्थांवर अमेरिकेने व्यापारी निर्बंध लादले आहेत, असे वृत्त ‘डॉन’ने दिले.
अमेरिकेच्या व्यापार विभागाच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, या सात संस्थांचा समावेश निर्यात प्रशासन नियमन (ईएआर) यादीत करण्यात आला आहे.
या संस्थांची नावे -
अहाद इंटरनॅशनल, एअर वेपन्स कॉम्प्लेक्स, इंजिनियरिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेरिटाईम टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स नॅशनल इंजिनियरिंग आणि सायंटिफिक कमिशन, न्यू आॅटो इंजिनियरिंग अँड युनिव्हर्सल टूलिंग सर्व्हिसेस. (वृत्तसंस्था)

Web Title: US restrictions on seven institutions in Pakistan