शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 19:46 IST2025-01-19T19:28:32+5:302025-01-19T19:46:33+5:30
या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती.

शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट
Donald Trump Meets Mukesh Ambani And Nita Ambani Before Swearing Ceremony : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याआधी भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांची भेट घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभ कार्यक्रमा आधी वॉशिंग्टन डीसी येथे खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. यात भारतीय पॉवर कपल मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचाही समावेश होता. वॉशिंग्टनमध्ये आयोजित खाजगी स्वागत समारंभात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी शपथविधी कार्यक्रमातील मुख्य अतिथीपैकी एक असू शकतात. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आणि भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या अंबानी यांच्यात डिनर भेटी वेळी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली ते गुलदस्त्यातच आहे. पण ही भेट भारत-अमेरिका यांच्यातील आर्थिक धोरणासंदर्भातील एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.
#WATCH | अमेरिका: वाशिंगटन में निजी रिसेप्शन में रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी और रिलायंस फाउंडेशन की संस्थापक और अध्यक्ष नीता अंबानी ने राष्ट्रपति-चुनाव डोनाल्ड ट्रंप को उनके शपथ ग्रहण समारोह से पहले बधाई दी।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2025
संयुक्त राज्य अमेरिका के 47वें राष्ट्रपति के रूप में… pic.twitter.com/pdDn838xSK
मुकेश आणि नीता अंबानी १८ जानेवारी रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या रॉयल लग्न सोहळ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटी आणि लोकप्रिय व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यात ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचीही झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या शपथविधीच्या खास सोहळ्यासाठी अंबानींची उपस्थिती लक्षवेधी ठरताना दिसत आहे.
ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, मेटा प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि हंगेरीचे नेते व्हिक्टर ऑर्बन आणि इतर नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.