शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:23 AM

कोणत्याही देशाकडून मदत मिळत असल्यानं पाकिस्तान एकाकी

वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर अमेरिकेनं त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनानं घेतली. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या माध्यमातू भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची खेळी होती. मात्र ती पूर्णपणे अपयशी ठरली.अमेरिका त्यांच्या जुन्या धोरणानुसार वाटचाल करणार असल्याची माहिती अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला यांनी दिली. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता ट्रम्प यांनी घूमजाव करत मध्यस्थी करण्यास नकार दिला. काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे या भागातील प्रश्न कायम देशांतर्गत स्वरुपाचे असतील. त्यात कोणत्याही तिसऱ्या देशानं लक्ष घालण्याची गरज नाही, अशी भारताची पूर्वीपासूनची स्पष्ट भूमिका आहे. मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानं पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगातील अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती करत आहेत. मात्र अद्याप तरी पाकिस्तानला कोणीही मदतीचा हात दिलेला नाही. कायम पाठिशी राहणाऱ्या चीनकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सहाय्य मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही पाकिस्तानला अपयश आलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पImran Khanइम्रान खान