शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला; भारतीयांना बसणार मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 09:35 IST

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना सर्वात मोठा धक्का

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एच-१ बी व्हिसा रद्दडिसेंबरपर्यंत एच-१ बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतातील आयटी अभियंत्यांना फटका बसणार

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताला मोठा फटका बसणार आहे. ट्रम्प यांनी वर्षाच्या अखेरपर्यंत एच-१ बी व्हिसा रद्द केला आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.कोरोनाचं संकट आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी यामुळे एच-१ बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या अमेरिकन नागरिकांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील व्यापारी संघटना, कायदेतज्ज्ञ, मानवाधिकार संघटना यांनी या निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.एच-१ बी व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ जूनपासून सुरू होईल. भारतातून मोठ्या संख्येनं माहिती तंत्रज्ञान अभियंते अमेरिकेत जातात. त्यांना नव्या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना आता स्टँपिंगच्या आधी किमान वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल. आपल्या एच-१बी व्हिसाचं नुतनीकरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभियंत्यांनादेखील या निर्णयाची झळ सोसावी लागेल. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जगभरातल्या २.४ लाख लोकांच्या स्वप्नांना ट्रम्प यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना एच-१ बी व्हिसा आवश्यक असतो. एका विशिष्ट कालावधीसाठी हा व्हिसा जारी करण्यात येतो. अमेरिकेतल्या अनेक आयटी कंपन्यांमध्ये भारतीय अभियंते काम करतात. त्यांची संख्या लक्षणीय आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका