शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:43 IST

पाकिस्तानकडे आता आमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक 'अद्भूत सहकारी' म्हणून बघत आहे...!

ज्या पाकिस्तानने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनला आपल्या घरात लपवून ठेवले, ज्या पाकिस्तानने लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांकरवी भारतात पहलगाम नरसंहार घडवून आणला. तोच पाकिस्तान आता अमेरिकेला दहशतवादाने ग्रस्त असलेला देश वाटत आहे. त्याच पाकिस्तानकडे आता आमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक 'अद्भूत सहकारी' म्हणून बघत आहे. हे सर्व कशामुळे तर, पाकिस्तानने दहशतवादी मोहम्मद शरीफुल्लाहसह आयएसआयएस (खुरासान)च्या  पाच दहशतवाद्यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण केले. खरे तर, अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल मायकेल कुरिला यांनी हे मान्य केले आहे. याचवेळी, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. एकासाठी दुसऱ्याला सोडता येणार नाही, असे कुरिला यांनी म्हटले आहे. 

यूएस सेंट्रल कमांडचे (सेंटकॉम) प्रमुख जनरल कुरिला यांनी आपल्या देशाच्या एका संसदीय (काँग्रेस) समितीसमोर पाकिस्तानचे कौतुक केले आहे. जनरल कुरिला यांच्या मते, २०२४ पासून अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात पाकिस्तानच्या भागात सुमारे एक हजार दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे हल्ले आयएसआयएस आणि तालिबान राजवटीच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या इतर दहशतवादी संघटनांनी केले आहेत. या हल्ल्यांत ७०० पाकिस्तानी सैनिक आणि २५०० नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. असे असूनही, पाकिस्तानी सैन्य या दहशतवाद्यांशी लढत आहे. यूएस सेंट्रल कमांड पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह आखाती देश आणि संपूर्ण पश्चिम आशियावर लक्ष ठेऊन असते.

आसिम मुनीरचं कौतुक -जनरल कुरिला यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जनरल कुरिला यांनी पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीरचे कौतुक केले आहे. कुरिल यांच्यामते, IS दहशतवदी शरीफुल्लाहच्या अटकेनंतर, मुनीर यांनी सर्वप्रथम आपल्यालाच फोन केला होता. तसेच, पाकिस्तान, त्याचे अमेरिकेला प्रत्यपर्ण करण्यास तयार असल्याचे, रक्षा सचिवांना सांगण्यास सांगितले होते.

काबुल एअरपोर्टवर US फोर्सेसव हल्ला -2021 मध्ये अफगानिस्तान सोडताना काबुल एअरपोर्ट येथे युएस फोर्सेसवर एक दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे एक डझनहून अधिक सैनिक मारले गेले होते. या हल्ल्यासाठी अमेरिकेने शरीफुल्लाहला आरोपी ठरवले होते. याच वर्षाच्या मार्च महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी शरीफुल्लाहला पकडून अमेरिकेच्या स्वाधीन केले होते. तेव्हापासूनच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या प्रेमात पडले आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी