शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 16:52 IST

दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं  दिली आहे. 

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या आदेशानंतर दूतावासाच्या आतून धूर दिसून येत आहे. अशी माहिती आहे की, चिनी कर्मचारी गोपनीय कागदपत्रे दूतावासात जाळत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं  दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ह्युस्टन पोलीसदेखील वकिलातीबाहेर जातात, पण मुत्सद्दी हक्कांमुळे ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. पोलिसांनी सांगितले की, दूतावासातून धूर निघत असल्याचं पाहून लोकांनी त्यांना माहिती दिली, त्यानंतर ते तेथे आले, पण चिनी अधिका-यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. शीतयुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने पहिल्यांदाच कोणत्या तरी देशाला दूतावास बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ह्युस्टनचे वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.अधिकारी गोपनीय फाइल्स जाळत आहेतइतक्या अल्पावधीत वाणिज्य दूतावास रिकामे करण्याच्या आदेशाने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला धक्का बसला आहे. अमेरिकेच्या आदेशानंतर चिनी दूतावासात गोंधळाचे वातावरण होते. एवढेच नव्हे, तर चिनी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गोपनीय कागदपत्रे जाळताना दिसत आहेत. कर्मचार्‍यांची कागदपत्रे जाळण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. जर अमेरिकेने हा चुकीचा आदेश मागे घेतला नाही, त्याचा 'न्याय्य व आवश्यक सूड' घेतला जाईल. दूतावातातून येणारे आगीचे लोट पाहिल्यानंतर ह्युस्टन अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचली, परंतु ती दूतावासाच्या आत गेली नाहीत. अमेरिकेच्या या निर्णयाने चीनशी असलेले त्याचे संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा

CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

LICच्या 'या' योजनेवर मिळतेय 15 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त एकच अट!

CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन