शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 20:42 IST

हिंदी महासागरात चीन करत असलेल्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स या भागात तैनात केले आहेत.

ठळक मुद्देआशियात अमेरिकेचे तीन एअरक्राफ्ट कॅरिअर तैनातअमेरिकन नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस निमित्झ आता अंदमान निकोबार बेटांजवळ पोहोचले आहे.या एअरक्राफ्ट कॅरिअरवर 90 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सशिवाय नौदलाचे जवळपास 3000 सैनिक तैनात असतात. 

वॉशिंग्टन - चीनसोबत तणाव सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण चीन सागरापासून हिंदी महासागरापर्यंत गस्त वाढवली आहे. चीनच्या जवळच दक्षीण चीन सागरात युद्धाभ्यास संपवून अमेरिकन नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस निमित्झ आता अंदमान निकोबार बेटांजवळ पोहोचले आहे. या भागात भारतीय नौदल आधीपासूनच युद्धाभ्यास करत आहे. 

आशियात अमेरिकेचे तीन एअरक्राफ्ट कॅरिअर तैनात -हिंदी महासागरात चीन करत असलेल्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स या भागात तैनात केले आहेत. सध्या यातील एक यूएसएस रोनाल्ड रिगन दक्षीण चीन सागरात, तर यूएएसएस थियोडोर रुझवेल्ट फिलिपिन्स सागराच्या जवळपास गस्त घालत आहे. अता अमेरिकेने अवलंबलेल्या या आक्रमक धोरानामुळे संतापलेला चीन सातत्याने युद्धाची धमकी देत आहे. 

यूएसएस निमित्झ किती शक्तीशाली -अमेरिकेच्या सुपरकॅरियर्समधील यूएसएस निमित्झ अत्यंत  शक्तीशाली मानले जाते. अणूशक्तीने चालणाऱ्या या एअरक्राफ्ट कॅरिअरला 3 मे 1975 रोजी अमेरिकन नौदलात सामील करण्यात आले. हे कॅरिअर स्टाइक ग्रुप 11 चा भागा आहे, जे स्वत:च्या बळावर अनेक देशांना उद्ध्वस्त करू शकते. 332 मीटर लांब असलेल्या या एअरक्राफ्ट कॅरिअरवर 90 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सशिवाय नौदलाचे जवळपास 3000 सैनिक तैनात असतात. 

कधीकाळी भारताविरोधात युद्धासाठी पोहोचला होता अमेरिकेचा सातवा ताफा -एयरक्राफ्ट कॅरिअर यूएएस निमित्स अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात सामील आहे. हा ताफा 1971मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बंगालच्या खाडीत आला होता. बांगलादेशात मार खात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मदत करणे हा त्याचा हेतू होता. मात्र तेव्हा रशिया भाराताच्या बाजूने ठेमपणे उभा होता. यामुळे अमेरिकेच्या या सातव्या ताफ्याला माघार घ्यावी लागली होता

चार देश चीनला घेरायला तयार -आता हिंदी महासागरात भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियादेखील चीनला घेरण्यासाठी तयार आहेत. सध्या याच मार्गाने चीनचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो आणि पेट्रोलीयम पदार्थांची आयात निर्यात होते. यामुळे त्याने कुठल्याही प्रकारचे वाकडे पाऊल उचलले तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या -

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलियाJapanजपानIndiaभारतandaman-and-nicobar-islands-pcअंडमान आणि नोकोबार द्वीप समूह