शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

अमेरिकन नौदलानं बंद केला सर्वात खतरनाक 'रेलगन' प्रकल्प, काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 9:09 PM

रेलगन सर्वसामान्य तोफांपेक्षा वेगळी आहे. इतर तोफांमध्ये बॅरलमधून स्फोटकं आगीच्या संपर्कात येऊन गोळा निघून जातो.

ठळक मुद्देरेलगन हायपरसोनिक शस्त्रांच्या पुढे अपयशी ठरलं आहे. अमेरिकेने हायपरसोनिक नावाचं असं शस्त्र बनवलं आहे.अमेरिकन नौदलाने मे महिन्यात याची घोषणा केली होती. हे शस्त्र लावल्यानंतर १५५ मिमीच्या अत्याधुनिक तोफा हटवाव्या लागतील.रेलगन ही पारंपारीक तोफांपेक्षा जास्त सुरक्षित आहे. स्फोटकांचे वापर नसल्याने जहाजात वजन कमी होतं.

अमेरिकेने त्यांचा महत्त्वकांक्षी आणि अत्याधुनिक शस्त्रांचा प्रकल्प बंद केला आहे. हा प्रकल्प अमेरिकेचे नौदल चालवत होती. अमेरिकन नौदलानं या प्रकल्पावर तब्बल ५०० मिलियन डॉलर्स म्हणजे ३६६७ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर आता हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं नाव इलेक्ट्रोमॅग्नटिक रेलगन डेवलपमेंट प्रोग्राम असं आहे आणि या शस्त्राचं नाव रेलगन(Railgun) असं आहे.

रेलगनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॉम्ब निघतो जो त्याच्या निशाण्यावर असलेल्याला उद्ध्वस्त करतो. अमेरिकेने नौदलाच्या २०२२ बजेटमधून रेलगन प्रकल्पाचं फंडिंग बंद केले आहे. नौदलाची तयारी आता हायपरसोनिक शस्त्र बनवण्यासाठी आहे. अमेरिकन नौदल असं शस्त्र बनवू इच्छितं की, ते दूरपर्यंत मारा करू शकेल. जहाज आणि जमिनीवरील टार्गेट मिनिटांत संपवेल.रेलगन प्रकल्प आता फक्त ट्रायल बेसिकवर सुरू होता. याला कोणत्याही नौदलाच्या जहाजावर तैनात करण्यात आलं नव्हतं.

रेलगन सर्वसामान्य तोफांपेक्षा वेगळी आहे. इतर तोफांमध्ये बॅरलमधून स्फोटकं आगीच्या संपर्कात येऊन गोळा निघून जातो. परंतु रेलगनमध्ये स्फोटकांऐवजी इलेक्ट्रिसिटी आणि चुंबकीय शक्तीचा उपयोग केला जातो. स्फोटकं नाहीत परंतु या दोन्ही शक्ती एकत्र आल्याने गोळा अनेक पटीने वेगाने जातो. परंतु अमेरिकन नौदलानं हा प्रकल्प बंद का केला त्याबाबत खुलासा केला नाही. रेलगन ही पारंपारीक तोफांपेक्षा जास्त सुरक्षित आहे. स्फोटकांचे वापर नसल्याने जहाजात वजन कमी होतं. त्याऐवजी जास्त गोळे ठेवले जातात. अमेरिकन नौदल या तोफांसाठी सरकारकडे बजेट मागत होती. त्यावर वारंवार चाचणी केली जात होती. २००५ मध्ये या प्रकल्पाची सुरूवात झाली.

सध्या अमेरिकन नौदलाकडे ३ युद्धनौका आहेत ज्यावर रेलगन लावली जाऊ शकते. २०२० मध्ये याची तयारी होणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे काम झालं नाही. अमेरिकन नौदल चीन आणि रशियाच्या स्पर्धेत उतरलं आहे. रेलगनमधून मारा केलेला गोळा ८० ते १६० किमीपर्यंत जातो. ही रेंज कमी असली तरी गती जास्त होती. आता अमेरिका त्यांच्या युद्धनौकांवर बॅलेस्टिक मिसाईल तैनात करणार आहे. जी चीनच्या DF21D मिसाईलचा सामना करू शकेल. रेलगनकडे विमान, मिसाईल आणि ड्रोनला मारण्याची क्षमता होती. परंतु नौदलाने रेलगनऐवजी पारंपारिक मिसाईल आणि तोफांना निवडणं योग्य मानलं.

काही तज्त्रांच्या मते, रेलगन हायपरसोनिक शस्त्रांच्या पुढे अपयशी ठरलं आहे. अमेरिकेने हायपरसोनिक नावाचं असं शस्त्र बनवलं आहे. ज्याची गती २०९९१ किमी प्रति तास आहे. त्याची रेंज २७३५ किमी इतकी आहे. म्हणजे रेंजमध्ये येणाऱ्या कोणत्याही वस्तूला अवघ्या काही सेकंदात नष्ट करू शकेल. अमेरिकन नौदलाने मे महिन्यात याची घोषणा केली होती. हे शस्त्र लावल्यानंतर १५५ मिमीच्या अत्याधुनिक तोफा हटवाव्या लागतील. हायपरसोनिक शस्त्राचा हल्ला वेगाने लक्ष्य भेदणारा आहे. त्याचसोबत ते स्वत: टार्गेट निश्चित करतं दुसरीकडे काही तज्त्र सांगतात चीनमध्ये रेलगन प्रकल्प बंद केला जाणार नाही कारण आता पीपुल्स लिबरेशन आर्मी रेलगनला महत्त्व देत आहे.

टॅग्स :Americaअमेरिका