शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

"भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर..."; अमेरिकन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:52 IST

अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांच्या एका गटाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली.

Donald Trump: टॅरिफ आणि अन्य व्यापारविषयक मुद्द्यांवरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेल्याने आता अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही खळबळ माजली आहे. अमेरिकेत १९ खासदारांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे बिघडलेले संबंध तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या '५० टक्के टॅरिफ' धोरणामुळे दोन्ही देशांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा स्पष्ट इशारा या खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

८ ऑक्टोबर २०२५ रोजी अमेरिकन काँग्रेसच्या १९ सदस्यांच्या गटाने हे पत्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लिहिले. डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्वाखालील या खासदारांनी ट्रम्प प्रशासनाला ५० टक्के टॅरिफचा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतासोबतचे अमेरिकेचे ताणलेले संबंध लवकरात लवकर सुधारावेत घ्यावे अशी विनंती केली आहे. या खासदारांमध्ये राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल यांचाही समावेश आहे.

पत्रानुसार, ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवरचा टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यात भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल २५ टक्के दंड देखील समाविष्ट आहे. या निर्यणामुळे केवळ भारतीय उत्पादकांनाच नाही, तर अमेरिकेतील ग्राहकांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे पुरवठा साखळीवर  नकारात्मक परिणाम होत असून, अनेक अमेरिकी कंपन्यांना उत्पादन बाजारात आणणे कठीण झाले आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

अमेरिकन खासदारांनी पत्रात भारताचे व्यापारी भागीदार म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. सेमीकंडक्टरपासून ते आरोग्य सेवा आणि ऊर्जेपर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी अमेरिकेचा उत्पादन व्यवसाय भारतावर अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना जगात वेगाने वाढणाऱ्या ग्राहक बाजारात प्रवेश मिळतो, तर भारतातून होणाऱ्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत रोजगारनिर्मिती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅरिफचा वाढता तणाव कायम राहिल्यास दोन्ही देशांच्या संबंधात धोका निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम अमेरिकी नागरिकांच्या खिशावर होईल, तसेच जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची अमेरिकन कंपन्यांची क्षमता कमकुवत होईल, असा इशाराही खासदारांनी दिला आहे. लोकशाही मूल्यांवर जोर देत, खासदारांनी ट्रम्प यांना या महत्त्वपूर्ण भागीदारीला बळ देण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.

या धोरणामुळे भारत चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जाण्याचा धोका असून, ही अमेरिकेच्या भू-राजकीय धोरणासाठी चिंतेची बाब आहे, असे महत्त्वपूर्ण भाकीत खासदारांनी केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे, याची आठवणही त्यांनी ट्रम्प प्रशासनाला करून दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fix India ties now, or else: US lawmakers warn Trump.

Web Summary : US lawmakers urge Trump to mend strained ties with India immediately. Tariffs harm both nations, pushing India closer to China and Russia. This endangers US geopolitical strategy and impacts American consumers.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारत