वॉशिंग्टन - अमेरिकेतील मेरीलँड प्रांताच्या बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. मेरीलँडच्या शेरीफने ही माहिती दिली. पोलीस गोळीबार करणा-या आरोपीचा शोध घेत आहेत असे हारफोर्ड कंट्रीचे शेरीफ जेफ्रे गाहलर यांनी सांगितले. हल्लेखोर आणि पीडित इदगीवूड येथील इमॉरटॉन बिझनेस पार्कमधील कंपनीशी संबंधित आहेत. खबदारीचा उपाय म्हणून या भागातील शाळाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)
अमेरिकेच्या मेरीलँड प्रांतात गोळीबार, तीन ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 21:21 IST