शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

coronavirus : फक्त 45 मिनिटांत होणार कोरोनाग्रस्ताची ओळख; 'या' देशाला मिळालं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 8:56 AM

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे. अमेरिकेनं हा जीवघेण्या आजार तात्काळ ओळखण्यासाठी तोडगा काढला आहे. 

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं देशभरात मृत्यूचा तांडव चालवला आहे. या जीवघेण्या व्हायरसनं आतापर्यंत 13 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे.भारतातही या जीवघेण्या रोगानं 7 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीला या कोरोना सर्वाधिक फटका बसला असून, त्या देशात दिवसाला जवळपास 500 ते 800 लोक मृत्युमुखी पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे.

वॉशिंग्टन:  कोरोना व्हायरसनं देशभरात मृत्यूचा तांडव चालवला आहे. या जीवघेण्या व्हायरसनं आतापर्यंत 13 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतातही या जीवघेण्या रोगानं 7 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीला या कोरोना सर्वाधिक फटका बसला असून, त्या देशात दिवसाला जवळपास 500 ते 800 लोक मृत्युमुखी पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे. अमेरिकेनं हा जीवघेण्या आजार तात्काळ ओळखण्यासाठी तोडगा काढला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने कोरोना व्हायरसच्या निदान चाचणीला मान्यता दिली आहे. संशयित रुग्ण हा कोरोना संक्रमित आहे की नाही, याबद्दल फक्त 45 मिनिटांतच माहिती मिळणार आहे. सध्या या व्हायरसच्या तपासणीस बराच वेळ लागतो आहे. कोरोनाग्रस्ताला ओळखण्याचं हे तंत्रज्ञान विकसित करणार्‍या कॅलिफोर्नियामधील आण्विक डायग्नोस्टिक्स कंपनीचे सेफेड म्हणाले की, शनिवारी एफडीएने या चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. आता याचा वापर रुग्णालये आणि आपत्कालीन सेवांमध्ये केला जाईल. पुढील आठवड्यात शिपिंगद्वारे हे तंत्रज्ञान इतर राज्यांत पोहोचवण्याची कंपनीची योजना आहे.एफडीएने स्वतंत्र मंजुरी देत यासंदर्भात एक निवेदन दिलं आहे. निवेदनात या तंत्रज्ञानाला मान्यता देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. निवेदनात म्हटले आहे की, 30 मार्चपर्यंत कंपनीला त्याच्या चाचणीची उपलब्धता सगळीकडे करून द्यायची आहे. सध्याची चाचणी सरकारी आदेशानुसार असेल आणि नमुने एका केंद्रीकृत प्रयोगशाळेत पाठविण्याचे सुनिश्चित केले गेले आहे, तेथून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे."आरोग्य आणि मानवी सेवा प्रधान करणारे सचिव अ‍ॅलेक्स अझर यांनी शनिवारी सांगितले की," आम्ही सावधानता आणि काळजी सारखे निदान करून उपकरणांबरोबर नव्या दिशेकडे वळतो आहोत.  जिथे अमेरिकन लोकांना त्वरित तपासणी उपलब्ध होईल. " 'अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, विलंब आणि अनागोंदीमुळे लोकांचे आयुष्यावरचं संकट वाढत चाललं आहे. शक्यतो डॉक्टर आणि परिचारिकादेखील यानं प्रभावित होत आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळजवळ 80 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रविवारी पहाटेपर्यंत देशभरात कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 396वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक वाईट प्रभाव हा महाराष्ट्रावर पडला आहे. देशातील 22 राज्ये कोरोनामुळे बाधित झाली आहेत.भारतीय रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोलकाता, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सोमवारपासून मेट्रो चालणार नाही. कोरोना विषाणूमुळे भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व उपनगरी गाड्या आज रात्री ते 31 मार्च दरम्यान बंद राहतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका