शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 1:08 PM

अनेक भारतीयांना मिळाली मोठी जबाबदारी, २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी

ठळक मुद्दे२० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधीकमला हॅरिसदेखील घेणार उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन यांनी विजय मिळवला. २० जनेवारी रोजी बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची  तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ऊर्जा आणि हवामान बदलांच्या वरिष्ठ सल्लागापदी  सोनिया अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे. सोनिया अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त बायडेन यांनी अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना संधी दिली आहे. यापूर्वीही सोनिया अग्रवाल यांनी बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असताना ऊर्जा विषयांत त्यांच्यासोबत मोलाची भूमिका बजावली होती. सोनिया अग्रवाल या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म ओहियोमध्ये झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. बायडेन यांच्या प्रशासनात स्थान मिळालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये कमला हॅरिस यांचंही नाव आहे. त्यादेखील २० जानेवारी रोजी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याव्यतिरिक्त निरा टंडन या कॅबिनेट रँकसह व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाच्या संचालक म्हणून काम पाहणार आहेत. विवेक मूर्ती सर्जन जनरल, वेदांत पटेल सहाय्यक माध्यम सचिव, विनय रेड्डी भाषण लेखन संचालक आणि गौतम राघवन हे राष्ट्रपती कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असणार आहेत. यांच्याव्यतिरिक्त बायडेन प्रशासनात स्थान मिळालेल्यांपैकी अतुल गवांडे, सेलीन गौंडर हे कोविड-१९ टास्क फोर्स सदस्य, भरत राममूर्ती राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक, सबरिना सिंह यांच्याकडे कमला हॅरिस यांच्या उप माध्यम सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माला बाया अदिगा यांच्याकडे जिल बायडेन यांच्या धोरण संचालक पदाची, शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माजू वर्गिस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दुसरीकडे तरूण छाब्रा, सुमोना गुहा यांनादेखील ट्रम्प प्रशासनात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाUS ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसIndiaभारत