अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 05:30 IST2025-12-18T05:30:06+5:302025-12-18T05:30:23+5:30
अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी २० देशांतील नागरिकांसाठी 'नो एंट्री'चा बोर्ड लावला आहे.

अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन: अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी २० देशांतील नागरिकांसाठी 'नो एंट्री'चा बोर्ड लावला आहे. ट्रम्प प्रशासनाने प्रवासबंदी आणि प्रवेश निर्बंधांचा विस्तार करत पॅलेस्टिनी प्राधिकरणालाही या यादीत टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर मंगळवारी स्वाक्षरी केली.
ज्यांच्याबाबत जोखमीचे मूल्यांकन करण्याइतकी माहिती उपलब्ध नाही, तसेच संबंधित देशांकडून सहकार्य मिळत नाही, अशांचा प्रवेश रोखणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अपवाद कोणाला?
कायमस्वरूपी रहिवासी (ग्रीन कार्ड धारक), विद्यमान व्हिसाधारक, काही विशेष व्हिसा श्रेणी (खेळाडू, राजनयिक) आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी प्रवेश आवश्यक असलेल्यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
निर्बंधांचा निर्णय कशामुळे?
अफगाणिस्तानातून २०२१ मध्ये स्थलांतरित झालेल्या एका अफगाण नागरिकाने गेल्या महिन्यात दोन नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने कारवाई वाढवली आहे.
१५ देशांवर अंशतः निर्बंध: अंगोला, अँटिग्वा अँड बारबुडा, बेनिन, आयव्हरी कोस्ट (कोट द'आयव्होर), डोमिनिका, गॅबॉन, गॅम्बिया, मलावी, मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया आणि झिम्बाब्वे.
५ देशांवर पूर्ण प्रवासबंदी : बुर्किना फासो, माली, नायजर, दक्षिण सुदान व सीरिया या देशांतील नागरिकांवर पूर्ण प्रवासबंदी व प्रवेश निर्बंध.