शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:40 IST

US Attacks Iran: अमेरिकेने बी-२ बॉम्बर विमानांच्या मदतीने केलेल्या या हल्ल्यात इराणमधील अणुकेंद्र आणि अणुकार्यक्रमाचं फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती अमेरिकेच्या एका फुटलेल्या गोपनीय अहवालातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

इस्राइलने इराणमधील अणुकेंद्रांना नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनमुळे दोन्ही देशांमध्ये उदभवलेला संघर्ष युद्धविरामानंतर अखेर थांबला आहे. सुमारे १२ दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान, दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तसेच इस्राइल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेनेही या युद्धात उडी घेत इराणमधील फोर्डो या प्रमुख केंद्रासह एकून तीन अणुकेंद्रांना लक्ष्य करत हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये इराणमधील ही अणुकेंद्रं पूर्णपणे नष्ट झाली असून, आता इराण कधीच अणुबॉम्ब तयार करू शकणार नाही असा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र अमेरिकेने बी-२ बॉम्बर विमानांच्या मदतीने केलेल्या या हल्ल्यात इराणमधील अणुकेंद्र आणि अणुकार्यक्रमाचं फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती अमेरिकेच्या एका फुटलेल्या गोपनीय अहवालातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं मुख्यालय असलेल्या पेंटागनचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी इराणमधील कारवाईबाबत माहिती देताना सांगितले होते की, अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर इनेक बॉम्ब टाकले आहेत. यादरम्यान, सुमारे १३ हजार किलो वजनाचे शक्तिशाली बॉम्बही टाकण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे इराणच्या अणुकेंद्रांना प्रचंड नुकसान झाले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झालेला नाही. मात्र त्याचा वेग मंदावला आहे, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने एका गोपनीय अहवालाच्या हवाल्याने दिलं होतं.

मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेलं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आम्ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी लष्करी हल्ला केला आहे. इराणचं अणुकेंद्र असलेला परिसर पूर्णपणे नष्ट झाला आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांमधील आपल्या पोस्टमधून केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचं अध्ययन करत असलेल्या दोन व्यक्तींनी सांगितले की, इराणच्या संवर्धित युरेनियमच्या साठ्याला नष्ट करण्यात यश आलेलं नाही. तसेच सेंट्रिफ्युज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. तर अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वीच इराणने संवर्धित युरोनियमला तिथून हटवलं होतं, असा दावा अन्य एका व्यक्तीने केला आहे.  तर व्हाईट हाऊसने इराणच्या अणुकेंद्रांवर झालेल्या हल्ल्याचा आढावा घेतला जात असल्याचं मान्य केलं. मात्र याबाबत करण्यात येत असलेले दावे मात्र व्हाईट हाऊसने फेटाळले आहेत.  

टॅग्स :United StatesअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प