शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हुथी बंडखोरांवर पुन्हा एकदा 'एअर स्ट्राईक'; अमेरिका ब्रिटनने संयुक्तपणे केला बॉम्बहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 08:27 IST

Red Sea Houthi Attack: व्यापाराच्या प्रवाहाचे रक्षण करताना कोणाचीही गय करणार नसल्याचा दिला इशारा

Red Sea Houthi Attack by US UK: अमेरिका आणि ब्रिटनने लाल समुद्रात पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही देशांनी येमेनमधील हुथींच्या तळांवर संयुक्त हवाई हल्ले केले आहेत. पेंटागॉनने सांगितले की, सोमवारी आठ तळांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये, अंडरग्राउंड स्टोरेज साइट आणि हुथींची मिसाइलवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीवर परिणाम करण्यात आला. इराणचे समर्थन असलेले हुथी बंडखोर इस्रायल किंवा पश्चिमेशी जोडलेल्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. लाल समुद्र हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. त्यामुळे हुथींचे तळ उद्ध्वस्त करण्याने व्यापाराच्या मुक्त प्रवाहाचे रक्षण केले जात आहे, असे अमेरिका व युकेकडून सांगण्यात आले.

पेंटागॉनने जारी केलेल्या संयुक्त निवेदनाने हुथींविरुद्ध हल्ल्यांची पुष्टी केली गेली. "सामरिक तणाव कमी करणे आणि लाल समुद्रातील परिस्थिती पूर्ववत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, परंतु यात आम्ही हुथींना चेतावणी देतो की त्यांनी हल्ले थांबवावे," असे निवेदनात म्हटले आहे. वाढत्या धोक्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या व्यापाराच्या मुक्त प्रवाहाचे रक्षण करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हुथींच्या तळांवर अमेरिकेचा हा आठवा हल्ला आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी झालेल्या संयुक्त हल्ल्यानंतर ब्रिटनसोबतची ही दुसरी संयुक्त कारवाई आहे.

मुस्लीम देशाकडून कारवाईला पाठिंबा

निवेदनानुसार या हल्ल्याला ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नेदरलँड्सकडूनही पाठिंबा मिळाला होता. मुस्लिम देश बहारीननेही पाठिंबा दिला. सोमवारच्या हल्ल्यांमध्ये यूएसएस आयझेनहॉवर या विमानवाहू युद्धनौकेच्या अमेरिकन लढाऊ विमानांचा समावेश होता. यूके संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चार आरएएफ टायफून, ज्यांना व्हॉयेजर टँकरच्या जोडीने पाठबळ मिळाले. ते यूएस सैन्यासोबत राहिले. या विमानांनी पेवेवे IV च्या बॉम्बने साना एअरफील्डच्या आसपासच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला. या तळावरून लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिपिंगच्या विरोधात सतत कारवाया सुरू होत्या, असा दावाही त्यांनी

टॅग्स :AmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIranइराणEnglandइंग्लंड