मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. आता या तणावा दरम्यान पाकिस्तानमधील बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी थेट भारताला पाठिंबा दिला आहे. मीर यार बलोच यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून पाकिस्तानशी संबंधित अंतर्गत माहिती दिली आहे. बलोच नेत्याने त्यांच्या पत्रात पाकिस्तान आणि चीनच्या योजनांचाही खुलासा केला आहे.
'भविष्यात चीन पाकिस्तानमध्ये आपले सैन्य तैनात करू शकतो, असा दावा त्यांनी या पत्रात केला आहे. बलोच नेत्याने इस्लामाबाद आणि बीजिंगमधील ही सुरू असलेली भागीदारी भारतासाठी खूप धोकादायक असल्याचे म्हटले आहे. बलोच नेत्याने भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना लिहिलेले हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील शेअर केले आहे.
पाकिस्तानला मुळापासून उखडून टाका
मीर यार बलोच यांनी एस. जयशंकर यांना पत्र लिहून म्हटले आहे की, "बलुचिस्तानमधील लोक गेल्या ७९ वर्षांपासून दहशतवाद आणि मानवी हक्कांचे घोर उल्लंघन सहन करत आहेत.
बलुचिस्तानमधील लोकांसाठी कायमस्वरूपी शांतता आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी या गंभीर समस्येचे मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली आहे.
"बलुचिस्तान प्रजासत्ताक पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या धोरणात्मक युतीला अत्यंत धोकादायक मानतो. आम्ही इशारा देतो की चीनने पाकिस्तानच्या सहकार्याने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतिम टप्प्यात आणले आहे, असेही यामध्ये लिहिले आहे.
"जोपर्यंत बलुच प्रतिकार आणि संरक्षण दलांना बळकटी दिली जात नाही आणि बलुच लोकांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, तोपर्यंत हा प्रदेश लवकरच चिनी सैन्याच्या हाती लागू शकतो, असा दावा मीर यार बलोच यांनी केला.
पाकिस्तान आणि चीनने आरोप फेटाळले
सीपीईसी अंतर्गत लष्करी विस्ताराचे आरोप पाकिस्तान आणि चीनने वारंवार फेटाळले आहेत. 'हा प्रकल्प आर्थिक स्वरूपाचा आहे. भारताने सीपीईसीला सातत्याने विरोध केला आहे, कारण त्याचा मार्ग पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून जातो, असा दावा चीन आणि पाकिस्तानचा आहे.
Web Summary : Baloch leader Mir Yar Baloch appealed to India's Jaishankar to dismantle Pakistan. He warned of China's growing military presence and economic corridor plans posing a significant threat to India, urging support for Baloch resistance.
Web Summary : बलूच नेता मीर यार बलोच ने भारत के जयशंकर से पाकिस्तान को खत्म करने की अपील की। उन्होंने चीन की बढ़ती सैन्य उपस्थिति और आर्थिक गलियारे की योजनाओं से भारत को खतरा बताया, और बलूच प्रतिरोध के लिए समर्थन का आग्रह किया।