पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:35 IST2025-09-12T15:35:11+5:302025-09-12T15:35:37+5:30

सिस्मोग्राफवर अनेक घटना रेकॉर्ड करता येतात. परंतू, एवढा काळ चाललेल्या लहरी या पहिल्याच होत्या. एवढा काळ लहरी सुरु असल्याने व जगभरात त्या पसरल्याने काहीतरी वेगळे असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

Unknown waves were roaming the Earth for 9 days...; That 2023 incident in Greenland and... | पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पृथ्वीवर अज्ञात लहरी नऊ दिवसांपर्यंत फिरत होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये या लहरी शास्त्रज्ञांनी पकडल्या होता. परंतू, अशा प्रकारचा कोणताच सिग्नल यापूर्वी मिळाला नव्हता. यामुळे सारे अचंबित झाले होते. खूप शोध घेतल्यानंतर ग्रीनलँडमध्ये एक निर्जन ठिकाणी अख्खा डोंगरच पाण्यात कोसळला होता, यामुळे २०० मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्यामुळे हा सिग्नल तयार झाल्याचे समोर आले होते. 

या भूस्खलनामुळे २०० मीटर उंचीची त्सुनामी आली होती. यापासून जो सिग्नल तयार झाला तो यापूर्वीच्या अशा घटनांपासूनच्या सिग्नपेक्षा खूपच वेगळा होता. स्टीफन हिक्स आणि क्रिस्टीयन स्वेननेविग यांनी यावर काम सुरु केले. या लहरींमध्ये इतर वेळच्या भूकंपासारख्या लहरी नव्हत्या. यामुळे तसा आवाज त्यात नव्हता. 

या लहरी एवढे दिवस टिकल्याने शास्त्रज्ञदेखील बुचकळ्यात पडले होते. सिस्मोग्राफवर अनेक घटना रेकॉर्ड करता येतात. परंतू, एवढा काळ चाललेल्या लहरी या पहिल्याच होत्या. एवढा काळ लहरी सुरु असल्याने व जगभरात त्या पसरल्याने काहीतरी वेगळे असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी ग्रीनलँडच्या डिक्सन फजॉर्डवर लक्ष वळविले. 

या भागातील डोंगरारांगांतून सुमारे १० हजार ऑलिंपिक स्विमिंग पूल भरतील एवढा मोठा डोंगर पाण्यात कोसळला होता. हे समुद्राचे पाणी आत घुसलेले होते. ते बर्फाळ पाणी होते, यामुळे २०० मीटर उंच लाटा उसळल्या आणि समोरच्या डोंगरांवर आदळत त्या समुद्रात लोटल्या गेल्या. यामुळे एकप्रकारचे कंपन तयाक झाले आणि त्याच्या लहरी जगभरात फिरू लागल्या होत्या. 
 

Web Title: Unknown waves were roaming the Earth for 9 days...; That 2023 incident in Greenland and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.