अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 10:22 AM2018-12-21T10:22:52+5:302018-12-21T11:55:46+5:30

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत.

United States Secretary of Defense James Mattis steps down | अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा

Next
ठळक मुद्दे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

सीरियामध्ये इसिसचा पाडाव झाला आहे असा ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सीरियामध्ये दोन हजाराच्या आसपास तैनात असलेले सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भारत-पाकिस्तान या दोन देशांत दहशतवाद आणि काश्मीर मुद्दांवरून तणाव असून दोन्ही देशात शांतता राहावी यासाठी पाकिस्ताननेभारताला सहकार्य करावे, अशी सूचना याआधी अमेरिकेने पाकिस्तानला केली होती. तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस हे मात्र भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या विरोधात होते. त्यामुळेच मॅटिस यांचा राजीनामा हा भारतासाठी मोठा धक्का आहे.  



 

Web Title: United States Secretary of Defense James Mattis steps down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.