शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 9:11 AM

मसूदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी हालचाली सुरू; चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यता

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेनं पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सनं पाठिंबा दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याबद्दलचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणण्यात आला होता. मात्र चीननं नकाराधिकार वापरुन तो हाणून पाडला. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आला आहे. मात्र यावर नेमकं मतदान कधी होणार, याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूद अजहरवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश यात्रांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात. अजहरवर बंदी घालण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावरील मतदानात चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सुरुंग लागला. चीननं चौथ्यांदा संयुक्त परिषदेत अजहरचा बचाव केला. अजहरबद्दलची माहिती आणि पुरावे गोळा करत असल्याचं चीननं म्हटलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीनचा समावेश आहे. प्रस्तावावरील मतदानावेळी यातील एकाही देशानं नकाराधिकार वापरल्यास प्रस्ताव रद्द केला जातो. 

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदchinaचीनPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाFranceफ्रान्सterroristदहशतवादीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ