United Nations Security Council member Masood Azhar warns China | संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा

वॉशिंग्टन : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने चौथ्यांदा खोडा घातला आहे. यामुळे नाराज झालेल्या संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी (यूएनएससी) इशारा दिला आहे की, जर चीन आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर परिषदेतील सदस्य अन्य पर्याय स्वीकारु शकतात. अन्य पाऊले उचलण्यास भाग पाडू नका.

सुरक्षा परिषदेच्या एका दूताने कठोर इशारा देत चीनला बजावले आहे की, जर चीनने आमच्या कार्यात अडथळा आणला तर आम्ही अन्य पाऊले उचलू शकतो. सुरक्षा परिषदेच्या या दूताने आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला सांगितले की, चीनची ही भूमिका दहशतवादाविरुद्ध लढणे आणि दक्षिण आशियात स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नातील अडथळा आहे. पाकिस्तानच्या भूमीवरील सक्रीय दहशतवादी समूह आणि त्यांचे प्रमुख यांना वाचविण्यासाठी चीनवर अवलंबून राहत असल्याबद्दल पाकिस्तानवरही या दूतांनी टीका केली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमॅन म्हणाले की, अझहरवर प्रतिबंध लावण्यासाठी चीनने सहकार्य करावे. 

चीनकडून समर्थन
मसूद अझहरप्रकरणी चीनने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, या विषयावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास संबंधित देशांमध्ये चर्चेसाठी यातून मदत मिळू शकेल. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले की, बिजिंगचा निर्णय समितीच्या नियमांनुसारच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भारतासह अन्य सदस्यांशी समन्वय करण्यास चीन तयार आहे.

Web Title: United Nations Security Council member Masood Azhar warns China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.