united arab emirates woman seeks divorce over husbands extreme love | आश्चर्य!...म्हणून चक्क पत्नीनं पतीकडे मागितला तलाक
आश्चर्य!...म्हणून चक्क पत्नीनं पतीकडे मागितला तलाक

नवी दिल्ली- बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये प्रेमाची भावना शिल्लक न राहिल्यानं घटस्फोट किंवा तलाकसारख्या घटना घडतात. परंतु पती जीवापाड प्रेम करत असल्यानं पत्नीनं तलाक मागितल्याचं कधी ऐकलं आहे, परंतु अशी घटना घडली आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये एका विवाहित महिलेनं विचित्र कारण देत तलाकची मागणी केली आहे.

पती माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. त्याच्या या प्रेमाच्या कडेलोटामुळे माझा जीव गुदमरतो. त्यामुळे माझं आयुष्यच नरक झालं आहे, त्यामुळे मला तलाक हवा असल्याचं त्या महिलेनं सांगितलं आहे. यूएईतल्या एका महिलेनं शरिया न्यायालयात सांगितलं की, लग्नाच्या वर्षानंतरच पतीला तलाक द्यायचा होता. कारण तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पतीच्या या अतीव प्रेमामुळे माझा जीव घुसमटतो, पती घराची सफाई करण्यातही माझी मदत करतो. पतीच्या या व्यवहारानं माझं जीवन नरक बनलं आहे.
 
महिला पुढे म्हणाली, मी पतीवर नाराज होते. परंतु पती एवढा रोमँटिक आहे की, मी एखादी चूक केल्यास मला लगेचच माफ करतो आणि माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. मला भांडणारा आणि चर्चा करताना पती हवा आहे. असं टेन्शनमुक्त जीवन मला जगायचं नाही. न्यायालयानं पतीच्या मागणीनंतर खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली असून, पती-पत्नीला समुपदेशनासाठी वेळ दिला आहे. 


Web Title: united arab emirates woman seeks divorce over husbands extreme love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.