अनोखी ऑफर ! उंदीर पकडा 20 हजार मिळवा
By Admin | Updated: October 19, 2016 17:55 IST2016-10-19T17:36:30+5:302016-10-19T17:55:25+5:30
रस्त्यावर आणि घरांमध्ये उंदरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. येथील लोकं उंदरांमुळे हैराण झाले आहेत, त्यामुळे उंदरांवर आवर घालता

अनोखी ऑफर ! उंदीर पकडा 20 हजार मिळवा
>ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. 19 - इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक आगळी-वेगळी मोहीम हाती घेण्यात आली आहे. येथे रस्त्यावर आणि घरांमध्ये उंदरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. येथील लोकं उंदरांमुळे हैराण झाले आहेत, त्यामुळे उंदरांवर आवर घालता यावा यासाठी येथील सरकारकडून अनोखी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
याद्वारे नागरिकांना उंदीर पकडण्याचं आवाहन करण्यात आलं असून एक उंदीर पकडल्यास 20000 हजार इंडोनेशियाई रूपिया म्हणजे भारतातील जवळपास 100 रूपये देण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल असा विश्वास इथल्या सरकारला वाटतो.
जकार्ताचे उप राज्यपाल जेरॉट सैफुल हिदायत यांनी सांगितलं की, रस्त्याने जाताना त्यांनी एक भलामोठा उंदीर बघितला, तो उंदीर इतका मोठा होता की एखाद्या मांजराचीही तो शिकार करू शकतो असं मला वाटलं. त्यानंतर उंदरांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू करण्याचा विचार केला होता असं ते म्हणाले. मात्र उंदरांना पकडण्यासाठी बंदुकींचा वापर करू नये असंही त्यांनी सांगितलं.