हमासला संपवू शकले नाहीत, दुःखी इस्रायली लष्करप्रमुखांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:44 IST2025-01-21T20:42:44+5:302025-01-21T20:44:55+5:30
इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीनंतर इस्रायली लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल हेरजी हालेवी यांनी राजीनामा दिला आहे.

हमासला संपवू शकले नाहीत, दुःखी इस्रायली लष्करप्रमुखांनी दिला राजीनामा
गेल्या काही वर्षापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, आता इस्त्रायलच्या सर्वोच्च कमांडर लेफ्टनंट जनरल हेरजी हालेवी यांनी राजीनामा दिला आहे. ते युद्धबंदीवर ते अधिकारी नाराज होते. ते म्हणाले की, हमासला पूर्णपणे संपवण्याचा संकल्प पूर्ण झालेला नाही. हमासचा हल्ला थांबवता आला नाही.
तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला भीषण आग; पर्यटकांनी उड्या मारल्या, ६६ जणांचा मृत्यू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही अनेक वेळा सांगितले होते की, हमास पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. रविवारी गाझामध्ये युद्धबंदी होती. यानंतर, इस्रायल आणि हमास दोघांनीही ओलिसांना सोडले आहे.
७ ऑक्टोबर रोजी हमासचा हल्ला रोखण्यात अपयश आल्याने त्यांना दुःख झाले आहे, असे हलेवी यांनी अलिकडच्याच एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच ते त्यांची जबाबदारी एखाद्या सक्षम व्यक्तीकडे सोपवण्याचा विचार करतील. १५ महिन्यांपूर्वी हमासने अचानक इस्रायलवर हल्ला केला यामध्ये किमान १२०० लोकांचा मृत्यू झाला आणि १०० जणांना ओलीस ठेवण्यात आले. यावेळी, इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केला आणि ४६ हजार पॅलेस्टिनींना ठार मारले.
हमासने तीन महिला ओलिसांची सुटका केली
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्यात हमासने तीन महिला ओलिसांची सुटका केली आहे. त्या बदल्यात, इस्रायलने ९० महिला ओलिसांना सोडले आहे. सध्या हमाससोबत ३३ ओलिसांना सोडण्याचा करार झाला आहे. इतक्या ओलिसांना ६ आठवड्यांच्या आत सोडण्यात येईल. यानंतर कराराचा दुसरा टप्पा होईल. गाझा पट्टीत मदत पोहोचवण्यासाठी ट्रकना परवानगी देण्यात आली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील ओलिसांना एकमेकांच्या हवाली करण्याच्या कराराचा एक भाग आहे. पॅलेस्टिनी महिला कैद्यांची सुटका हे इस्रायलचे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, यामुळे पॅलेस्टिनी आणि इस्रायली बाजूंमधील तणावपूर्ण परिस्थिती काही प्रमाणात कमी होऊ शकते.