शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Russia Ukraine War : 'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'; विद्यार्थ्यांची आर्त साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:31 IST

Russia Ukraine War : युक्रेनमधील या तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी हे अडकून राहिले आहेत. 

रशियाचे सैन्य युक्रेनच्या जमिनीवर आता आणखी वेगाने आक्रमण करत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपेक्षा येणारी परिस्थिती भयानक ठरण्याची शक्यता आहे. रशियाने रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले होते. यापेक्षा जास्त हल्ले सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील या तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीयविद्यार्थी हे अडकून राहिले आहेत. 

भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याने मदतीसाठी साद घातली आहे. "ब्रेडचा एक तुकडा उरलाय, बंकरमध्ये हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला" असं त्याने म्हटलं आहे. असोयुन हुसैन असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. बंकरमध्ये अडकून राहिलेल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे याची त्याने माहिती दिली आहे. एका न्यूज एजन्सीसोबत फोनवर चर्चा करताना हुसैन याने "युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जेवण आणि औषधं मिळणं अत्यंत कठीण झालं आहे कारण येथे स्थानिक लोकांना प्राथमिकता दिली जात आहे."

"पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास पाहावी लागतेय वाट"

"बंकरमध्ये तापमान इतकं खाली गेलं आहे की बर्फ जमा झाला आहे. गेल्या 48 तासांत आमच्याकडे खाण्यासाठी फक्त ब्रेडचा एक छोटासा तुकडा उरला आहे. जेवण तर लांबची गोष्ट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बंकरमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आमचं जॅकेट देखील खराब झालं आहे. थंडी इतकी आहे की नेमकं काय करावं हे समजत नाही. आमच्याकडे 4-5 बेडशीट होत्या. आम्ही त्यावरच रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर झोपत आहोत" असं असोयुन हुसैन याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती

युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं असताना आता आणखी एक नवीन मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील भीती व्यक्त केली आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये 600 रुग्णालये आहेत. तेथे अजूनही 1700 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी